डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
सर्वसाधारण माहिती
प्रकार राष्ट्रीय स्मारक
ठिकाण २६ अलीपूर रोड, दिल्ली
बांधकाम सुरुवात २१ मार्च २०१६
पूर्ण १३ एप्रिल २०१८
मूल्य २०० कोटी रूपये
क्षेत्रफळ ७,३७४ चौरस मीटर
मालकी भारत सरकार

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (इंग्रजी: Dr. Ambedkar National Memorial) हे २६ अलीपूर रोड, दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. हे बाबासाहेबांचे निवासस्थान होते व येथेच त्यांचे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण झाले होते, त्यामुळे याला महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन व लोकार्पन करण्यात आले. स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[१] स्मारकाला सुमारे २०० कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.[२]

इतिहास[संपादन]

इ.स. १९५१ मध्ये केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील १, हार्डिंग ॲव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडले आणि २६ अलीपूर रोड इथल्या सरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहायला आले. १९५१ ते १९५६ या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्याचे ६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण (निधन) झाले. म्हणून या वास्तूला 'परिनिर्वाण स्थळ' म्हटले जाते.

या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी मागील १२ वर्षापूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचे स्मारकात रुपांतर करावे या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झाले. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीने २ डिसेंबर २००३ रोजी या घराचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.

२१ मार्च २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले.[३][४] दोन वर्षानंतर १२७व्या आंबेडकर जयंतीच्या एक दिवस आधी, १३ एप्रिल २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन केले.[५][६]

स्मारकाची वैशिष्ट्ये[संपादन]

 • एकूण जागा ७,३७४ चौरस मीटर, ४,५६१.६२ चौरस मीटरचे बांधकाम.
 • स्मारकाच्या प्रवेशद्वारावर अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे.
 • इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधान या पुस्तकासारखी आहे, जे ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक आहे.
 • बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार.
 • बाबासाहेबांचा एक भव्य पुतळा स्मारकात आहे.
 • थ्री डी इफेक्ट द्वारे बाबासाहेब प्रत्यक्ष आपले विचार मांडताना दिसतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण". News18 Lokmat (mr-IN मजकूर). 2018-11-02 रोजी पाहिले. 
 2. ^ "पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस" (hi मजकूर). 2018-11-02 रोजी पाहिले. 
 3. ^ "प्रधानमंत्री ने डॉ अम्बेडकर राष्ट्रीय स्मारक का शिलान्यास किया". www.narendramodi.in. 2018-11-02 रोजी पाहिले. 
 4. ^ पोळ, रवींद्र मांजरेकर/गणेश (2017-12-06). "इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार". BBC News मराठी (en-GB मजकूर). 2018-11-02 रोजी पाहिले. 
 5. ^ पोळ, रवींद्र मांजरेकर/गणेश (2017-12-06). "इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार". BBC News मराठी (en-GB मजकूर). 2018-11-02 रोजी पाहिले. 
 6. ^ "पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस" (hi मजकूर). 2018-11-02 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]