डोकेदुखी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनेक आजारांमध्ये डोकेदुखी हे एक लक्षण असते. कधीकधी मात्र डोकेदुखी हाच आजार असतो. डोकेदुखीचे मुख्य चार प्रकार आहेत. १. अर्धशिशी..२. पूर्ण कपाळ दुखणे. ३. कपाळाव्यतिरिक मस्तकाचा अन्य भाग दुखणे आणि ४. थांबून थांबून डोके दुखणे.

कारणे : मानसिक श्रम, मानसिक तणाव, शारीरिक श्रम, गोंगाट, खोकला, लैंगिक असमाधान, अपचन. पित्तप्रकोप, अतिझोप, चहाच्यावेळी चहा न मिळणे, डोक्याला मार लागणे, टेंगूळ येणे, प्रवासात वगैरे डोक्याला जोराचा वारा लागणे, मद्यप्राशनानंतर दुसऱ्या दिवशी येणारी विषण्णता, मेंदूतील रक्तस्राव, मेंदूत असलेली गाठ, चष्म्याचा नंबर वाढलेला असणे, सर्दी होणे, तापाच्या लक्षणांची सुरुवात असणे आणि मज्जारज्जूंपासून निघालेली त्रिशाखी नस विकारग्रस्त असणे, इत्यादी.. या नसेला पाचवी नस असेही म्हणतात.

बाहेरील दुवे[संपादन]

  • [१] Archived 2015-08-08 at the Wayback Machine.‘अ‍ॅक्युप्रेशर’- मिनिटाभरात डोकेदुखी दूर करणारा झटपट उपाय