Jump to content

येवला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(येवले या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक, येवला

येवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचे छोटे शहर आहे. येथे हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात.

इ.स. १८५७ च्या भारतीय उठावातील सेनानी तात्या टोपे यांचा जन्म येवल्यात झाला [ संदर्भ हवा ].

मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे प्रथम केली होती, त्या ठिकाणी २०१४ साली मुक्तिभूमी स्मारक निर्माण केले गेले. नाशिक जिलह्यामधील एक दुष्काळी तालुका म्हणून देखील ओळख आहे कांदा पीक इथे मोठ्या प्रमाणत घेतले जाते.

भौगोलिक माहिती

[संपादन]

येवला उर्फ येवले हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. येथे नगरपालिका असुन तिची स्थापना इ.स १८५३ साली झालेली आहे. मनमाडच्या दक्षिणेस २९ किमी तसेच शिर्डी पासून उत्तरेकडे ३३ किमी अंतरावर नगर-मनमाड व नाशिक औरंगाबाद महामार्गच्या चौफुलीवर वसलेले आहे. जागतिक नकाशात अक्षांश २० .० ३ व रेखांश ७४.४३. या वर आहे. तसेच समुद्र सपाटीवरून ५६० मी उंचीवर आहे. येवला तालुक्यात अंजीठा पर्वत रांगातील डोंगरे असुन अनकाई व टनकाई किल्ले आहेत.

येवला पैठणी

[संपादन]

येवला पैठणी पारंपरिक पैठणी हा शब्द खास करून अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी निगडीत आहे. पैठणी खास करून औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे पूर्वी तयार होत असल्याने अशा या विशिष्ठ साडीस पैठणी हे नाव पडले आहे. पैठणीचे उत्पादन स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत आले. राजाश्रय संपल्यानंतर याचे खास कारागिरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्कळीत झाले व जुन्या विणकामामध्ये काम मिळेल तेथे समावेश होत गेले. बनारसी पद्धतीचा शालू, साडी व फेटे करू लागले. त्यातील काही कसबी कामगार किंवा कारागीर निजामशाहीच्या हद्दीबाहेरचे गाव येवला येथे येऊन स्थायिक झाले. महाराष्ट्रातील येवला व पैठण येथे तयार होणारी पैठणी जगात प्रसिद्ध असून तिला परदेशातून मागणी आहे. पैठणी तयार करणे ही पैठण व येवला येथील पारंपारिक कला आहे. सन १९७३ मध्ये हिमरु पैठणी मश्रूम प्रदर्शनात मांडली गेली व त्यास चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ७५-७६ मध्ये येवल्यातील कारागिरांनी पैठणी प्रदर्शनात ठेवली व त्यावेळेस येवल्यात असलेल्या कारागिरांना सुमारे ५ वर्ष पुरेल असे काम मिळाले व ७४-७५ पासून येवला पैठणी अस्तित्वात आली. १९७७ मध्ये पहिले हातमाग प्रदर्शनामध्ये येवला पैठणीने प्रसिद्धी मिळविली. त्यावेळी अवघे १० ० माग येवला येथे होते. आज येवला, नागडे, वडगांव, बल्लेगांव, सुकी १ध्४गणेशपूर१ध्२ या गावामध्ये एकूण ८५० कुटुंबे २२० ० मागावर आपला व्यवसाय करीत आहेत. यातील काही कारागिरांनी राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार व इतरही काही पुरस्कार मिळविले आहेत. येवला आणि उपरोक्त परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी, कोष्टी, मराठा, नागपूरी,मुसलिम समाजातील आहेत. आर्थिक दश्ष्टया उपरोक्त कारागिरांची प्रामुख्याने वर्गीकरण करता येईल.

१. कोणतेही भांडवल उपलब्ध नसलेले उधारीवर कच्चा माल आणून पैठणी तयार करून देणारे

२. कच्चा माल खरेदी करून पैठणी तयार करून देणारे

३. कच्चा माल देऊन पैठणी तयार करवून घेणारे व्यापारी

इ.डी.पी. अंतर्गत २५ कारागिरांचे सेंट्रल सिल्क बोर्ड यांचे सहकार्याने १ महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यापैकी २ प्रशिक्षणार्थंींनी आपली प्रगती केली आहे. पैठणीमध्ये प्रामुख्याने सेमी पैठणी, सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. याशिवाय पदराच्या व काठ यांच्या विशिष्ठ नक्षीकामानुसार मुनिया ब्रॉकेट व ब्रॉकेट असे वर्गीकरण करता येते. तसेच विणकाम पद्धतीनुसार एकधोटी व तीन धोटी असेही प्रकार दिसून येतात. सिंगल पदरमध्ये काठ नारळाच्या नक्षीचा काठ व पदरामध्ये तीन मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते, डबल पदरामध्ये नारळ काठ व सात मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते. यासाठी रेशीम धागा वापरला जातो. टिशू पदरामध्ये जर शक्यतो त्रिम वापरली जाते व पदरामध्ये बारा मोर अगर कोयरी तीन ओळीत नक्षीकाम केलेले असते. रिच पदरमध्ये ग्राहकाच्या पसंतीनुसार पदराच्या नक्षीकामाची निवड केली जाते. सिंगल पदर १८-२१ इंचाचा तर डबल पदर २८-३२ इंचाचा असतो. सिंगल पदर पैठणीस ४ ते ५ दिवस, डबल पदर पैठणीस ७ ते ८ दिवस, टिशू पदर १ ते दीड महिना व रिच पदर पैठणीस ४-६ महिने विणकामास लागतात. पदराच्या नंतर एक मीटर पर्यंत बुटी ३ इंच अंतरावरती व त्यानंतरच्या ६ इंच अंतरावर असतात. यामुळे ३ इंच अंतरावर असलेल्या दाट बुटयांचा भाग हा पदरानंतर दर्शनी भागावर येतो तर विरळ बुटयांचा भाग हा निऱ्यांमध्ये जातो त्यामुळे पैठणी उठावदार दिसते.

मुनिया ब्रॉकेट पैठणीचे वैशिष्ठय म्हणजे काठ लहान व पोपटाची चोच लांब असते यामध्ये सिंगल पदर, डबल पदर आणि रिच पदर येऊ शकतात. ब्रॉकेट पैठणीमध्ये राजहंस, मोर, पोपट, आसावली व कमळ यांचे नक्षीकाम पदरामध्ये ग्राहकांच्या पसंतीने केले जाते. एक धोटीमध्ये सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. तीन धोटीमध्येही सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. यास कडियल किंवा परती असेही म्हणतात. पैठणी साडीची किंमत साधारणपणे रु.२५० ० पासून ३ लाख रुपयापर्यंत असते. मध्यम व उच्चवर्गीय ग्राहक ५ ते १० हजारापर्यंतची पैठणी पसंत करतात.

विशेष म्हणजे माननीय राष्ट्रपती यांचेकडून शांतीलाल भांडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.मनोज दिवटे यांना केंद्र सरकार ने तसेच संजय सोनी व श्रीनिवास सोनी यांना राज्यपाल यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.बाळकृष्ण कापसे यांनी आपल्या कापसे फाऊंडेशन च्या वतीने अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा समारंभ निमित्त रेशमी वस्त्र नागरिकांचे मदतीने तयार करून अर्पण केले.संस्कृत विद्वान पं.डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी लिहिलेल्या व्यवसायाची पैठणी हा शोधनिबंध विशेष प्रसिद्ध आहे.श्री निकुंभ सर यांनी पैठणीवर एम.फील प्राप्त केलेली आहे. येवलेकरांनी पैठणी व्यवसायासाठी विश्वास व अभिमान टिकवून ठेवला आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]
  • [[येवला तालुक्यातील एक अपरिचित गाव - बदापुर]

बदापुर येवला तालुक्यापासून ४ किलोमीटर अंतरावरील असलेले एक छोटेसे खेडेगाव. जे तालुक्याच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असले तरी दळणवळणच्या साधनांच्या सुविधा नसल्याने सर्वांपासून अपरिचित असलेले छोटे खेडेगाव. सतत पाणीटंचाई आणि रस्त्याच्या दूरव्यवस्थेने त्रस्त झालेले गावकरी आणि कसरत करून शाळेचा रस्ता सर करणारे विद्यार्थी यांच्या पलीकडे जाऊन कोणी गावाबद्दल न बोलणारे लोक आज गावात वेगळा ठसा उमटावा असे कार्य करायला पण पुढे न येणारे गावकरी. गावातील व्यक्तींपेक्षा इतर ठिकाणी कश्या पद्धतीने राजकारण किंवा सुविधा कर्ता येतील हे सांगणारे पण घरचा आणि गावाचा विषय आल्यावर मागे हटणारे गावकरी अश्या गावातील मी पण एक नागरिक आहे. मग माझी काय वेगळी अवस्था असेल का मी पण त्या शाळकरी मुलांचा अनुभव घेतलाय. पावसाळ्यात होणारे हाल आणि आता झालेल्या सुखसुविधा यामधील दरी न भरू येणारी आहे. आपण ज्या गावात राहतो त्या गावावर जर असा अन्याय झालेला असेल असेंल आणि आपण त्या गावचे रहिवासी आहे. हे सांगणे तितके आनंददायक नाही की, एखांदा क्रांतिवीर ,आमदार-खासदार आमच्या गावचा आहे असे अभिमानाने सांगू शकेल. अशा परिस्थितीतीत

बदापुर हे मोती नदीच्या काठावरील आणि शांतता लाभलेले एक गाव आहे. करण इतर गावांप्रमाणे गावातुल शेजारील गावांना जोडणारा कोणताही पक्का रस्ता नसल्याने आणि नाशिक जिल्ह्यातील शेवटचे गाव असल्याने आणि तालुक्यातील इतर गावांना जोडणारे पक्के रस्ते हे इतर मार्गांने जातात म्हणून गावात इतर रहदारी नाही. त्यामुळे गावात बस, रिक्षा, तसेच इतर साधने नाही. गावातील सुरुवातीची शाळा ही जेमतेम प्राथमिक चौथी पर्यंतची शाळा आता सातवी पर्यंत झाली. ]

संदर्भ

[संपादन]