लोकराज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लोकराज्य महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केले जाणारे मासिक आहे. हे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे. याच्या मुद्रक व प्रकाशन मीनल जोगळेकर आहेत तर संपादक ब्रिजेश सिंह आहेत.

महाराष्ट्र शासनामार्फत विविध विषयावर होत असलेली कामे, सरकारची धोरणे, कला, संस्कृती, भाषा, इत्यादी विषयांचे लोकराज्याचे विशेषांक निघतात. या मासिकाची इंग्रजी आवृत्ती महाराष्ट्र अहेड या नावाने प्रसिद्ध होते. हे मासिक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध असते. संकेतस्थळावर इ.स. १९४७ सालापासूनचे अंक ऑनलाइन पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.

बाह्य दुवे[संपादन]