Jump to content

जय भीम नेटवर्क, हंगेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जय भीम नेटवर्क हे हंगेरी देशातील जिप्सी लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरित होऊन बनवलेले एक सामाजिक व शैक्षणिक संघटन आहे.[] नेते जानोस ओरसोस यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी हा विचार हंगेरीतील जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोम लोकांनी आपल्या स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत समानता पाहिली, कारण जिप्सी ही सुद्धा अस्पृश्यांप्रमाणे हंगेरीतील एक शोषित जमात होती. जिप्सी लोकांनी आंबेडकरांपासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. तसेच २००७ मध्ये सांजाकोजा शहरात डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी नावाची शाळा सुरू केली. जयभीम नेटवर्कने या शाळेला डॉ. आंबेडकरांचा अर्धपुतळा १४ एप्रिल २०१६ रोजी भेट दिला होता.[] जयभीम नेटवर्क हंगेरीयन विशेषतः जिप्सी लोकांमध्ये आंबेडकरवादाचा प्रचार व प्रसार करते, लोकांना सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मदत करते. तसेच बौद्ध धम्माचे विचार लोकांमध्ये रूजवतात.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Jai Bhim Network Hungary | Dr. B. R. Ambedkar's Caravan". drambedkarbooks.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Jai Bhim Network Hungary". Dr. B. R. Ambedkar's Caravan (इंग्रजी भाषेत). 2016-04-15. 2018-04-06 रोजी पाहिले.