फेब्रुवारी १७
Appearance
<< | फेब्रुवारी २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४८ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]- १६७० - शिवाजी महाराजांनी मुघलांकडून सिंहगड किल्ला जिंकला.
- १६९८ - औरंगजेबाने जिंजी किल्यावर कब्जा केला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८०१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखी मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसनला राष्ट्राध्यक्ष तर बरला उपाध्यक्ष केले.
- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सी.एस.एस. हनलीने उत्तरेचे यु.एस.एस. हुसाटॉनिक हे जहाज बुडवले.
- १८६५ - अमेरिकन यादवी - दक्षिणेच्या सैन्याने कोलंबिया, दक्षिण कॅरोलिनातुन पळ काढला. जाताना शहरास आग लावली.
- १८६७ - सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
- १८८२ - सिडनी क्रिकेट मैदानावर पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळला गेला.
विसावे शतक
[संपादन]- १९२७ - वीर वामनराव जोशी द्वारा लिखित रणदुंदुभी नाटकाचा प्रयोग मुंबईमध्ये झाला, त्यामध्ये दीनानाथ मंगेशकरांनी तेजस्विनीची भूमिका केली.
- १९३३ - अमेरिकेतील न्यूझवीक हे नियकालिक पहिल्यांदा प्रकाशित झाले.
- १९३३ - अमेरिकेत दारूबंदी समाप्त.
- १९५७ - अमेरिकेत वॉरेंटन, मिसुरी येथील वृद्धाश्रमात आग. ७२ ठार.
- १९५८ - पोप पायस बाराव्याने असिसीच्या संत क्लेरला दूरदर्शक संचाचा रक्षक संत जाहीर केले.
- १९५९ - हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हॅंगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.
- १९६२ - जर्मनीत हांबुर्ग येथे हिमवादळ. ३०० ठार.
- १९६४ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॉॅंग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्या लोकसंख्येचेच पाहिजेत.
- १९७४ - रॉबर्ट के. प्रेस्टन या अमेरिकन सैनिकाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात(व्हाइट हाउस) हेलिकॉप्टर उतरवले.
- १९७९ - चीन व व्हियेतनाममध्ये युद्ध सुरू.
- १९९५ - संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर पेरू व इक्वेडोरने युद्धसंधि केला.
- १९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.
- १९९७ - नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००२ - दहशतवाद्यांनी जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात नरला गावात एकाच परिवाराच्या ८ लोकांची हत्या केली.
- २००२ - नेपाळमध्ये माओवादींच्या मोठ्या हल्ल्यात सेना व पोलिसांच्या १२९ जवानांसहित १३८ लोकांची हत्या, प्रत्युत्तर कार्यवाहीमध्ये १०० हुन अधिक विद्रोही मारले.
- २००४ - फूलनदेवी हत्याकांडाचा मुख्य मुख्य आरोपी शमशेर सिंह राणा तिहाड़ जेलमधून फरार
- २००५ - बांगलादेशची लेखिका तसलीमा नसरीनने भारतीय नागरिकतेचि मागणी केली
- २००६ - फिलिपाईन्सच्या दक्षिण लेयटे भागातील सेंट बर्नार्ड गावावर दरड कोसळून १,००पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
- २०२५ - डेल्टा एरलाइन्सचे एक विमान अमेरिकेतील मिनियापोलिस येथून कॅनडातील टोरांटो हिमाच्छादित विमानतळावर विमान उतरताक्षणी चक्क उलटले आणि उलटतानाच विमानाच्या शेपटीकडील बाजूस आग लागली. या विमानात ७६ प्रवासी आणि चार कर्मचारी होते. हे सर्व ८० जण बचावले.
जन्म
[संपादन]- १८१७ - विल्यम तिसरा, नेदरलॅंड्सचा राजा.
- १८९९ - जीवनानंद दास, बंगाली साहित्यिक.
- १९५४ - के. चंद्रशेखर राव, तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री.
मृत्यू
[संपादन]- ३६४ - जोव्हियन, रोमन सम्राट.
- १८८३ - वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारी.
- १९१९ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९३४ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा.
- १९६८ - कैलाश नाथ काटजू, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री.
- १९८६ - जिद्दू कृष्णमूर्ति, भारतीय दार्शनिक.
- १९८८ - कर्पूरी ठाकुर, बिहारचे मुख्यमंत्री.
- १९९४ - चिमनभाई पटेल, गुजरातचे मुख्यमंत्री.
- २००५ - पंडित सीताराम चतुर्वेदी, हिंदी साहित्यिक आणि पत्रकार.
- २०१७ - वेद प्रकाश शर्मा, हिंदी लेखक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- उत्पादकता सप्ताह
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - (फेब्रुवारी महिना)