रानडे, गांधी आणि जीना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रानडे, गांधी आणि जीना (इंग्रजी: Ranade, Gandhi and Jinnah) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. इ.स. १९४३ सालच्या १८ जानेवारी रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच इ.स. १८९६ मध्ये स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक इंग्रजी व्याख्यान दिले. हे भाषण पुढे ‘रानडे, गांधी आणि जीना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात बाबासाहेबांनी महादेव गोविंद रानडे, मोहनदास करमचंद गांधी आणि मोहम्मद अली जिना या तीन व्यक्तित्वांची तुलना केली आहे व त्यात रानडे हे गांधी व जिनांपेक्षा थोर असल्याचे सांगितले आहे. व्यक्तिपूजा (हीरो वरशिप) चांगली गोष्ट नाही, कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते, असे या पुस्तकात सांगितले आहे.

मराठीतले हे पुस्तक पुण्यातील जोशी ब्रदर्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत होते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]