सहजानंद सरस्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वामी सहजानंद सरस्वती (१८८९ - १९५०) हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकरी नेते होते. हे दशनामी आखाड्याचे संन्यासी असून संस्कृत पंडित आणि लेखक होते. त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केले. हे भाष्य मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. त्यांनी गीता आणि मार्क्सवाद यांचा तुलनात्मक अभ्यास करणारा एक ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्यावर शंकराचार्यांपासून मार्क्सपर्यंतचा प्रभाव होता. गीतेतच खरा मार्क्सवाद आणि साम्यवाद सापडतो अशी त्यांची भूमिका दिसते. ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कॉ. नंबुद्रीपाद यांचा आदर करीत. त्यांनी पूर्व-मीमांसा, वेदान्त, भागवत, शंकराचार्य, मार्क्सवाद, गांधीवाद आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, इ. क्षेत्रांत काम केले. भाष्यग्रंथांच्या आधारे नव्हे तर जीवनानुभवाच्या आधारे गीता समजते हे त्यांचे मुख्य प्रतिपादन आहे.

त्यांनी अखिल भारतीय किसान सभा या संघटनेच्या स्थापनेचे काम केले.

गीताहृदय[संपादन]

सहजानंद सरस्वतींचे गीतेवरील भाष्याचे नाव गीताहृदय आहे. भाष्याचे दोन खंड असून शिवाय परिशिष्टे आहेत. सन १९४१ ते १९४२ या काळात कारावासात असताना त्यांनी ते लिहिले.

पुस्तके[संपादन]

१. ब्राह्मण समाज की स्थिति - १९१६
२. ब्रह्मर्षि वंश विस्तार – १९१६
३. झूठ भय और मिथ्या अभिमान – १९१६
४. कर्म कलाप – १९२६
५. गया के किसानों की करुणा कहानी – १९३३
६. भूमि व्यवस्था कैसे हो – १९३५
७. The Other Side & The Shield - १९३८
८. Rent Reduction in Bihar: How it Works - १९३९
९. मेरा जीवन संघर्ष ( आत्मचरित्र) – १९४०
१०. किसान कैसे लड़ते हैं – १९४०
११. किसान क्या करें – १९४०
१२. किसान सभा के संस्मरण – १९४०
१३. झारखण्ड के किसान – १९४१
१४. खेत मजदूर - १९४१
१५. क्रांति और संयुक्त मोर्चा – १९४१
१६. गीता ह्रदय (तत्त्वज्ञान) – १९४२
१७. जमींदारी का खात्मा हो – १९४६
१८. किसानों को फंसाने की तैयारी – १९४६
१९. अब क्या हो – १९४७
२०. महारुद्र का महातांडव – १९४८
२१. किसानों के दवे और कार्यक्रम का खरीता – १९४९