कबीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कबीर

कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.[१]संत कबीर यांचा जन्म कधी झाला याबद्दल एकमत दिसून येत नाही. कोणी ते इ.स. ११४९ मध्ये जन्माला आले असे मानतात तर कुणी १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात.[२] कबीर हे हिंदू संत आहेत की सुफी संत आहेत याबाबत अभ्यासकात एकमत नाहीं असे दिसून येते. पण कबीरांच्या साहित्यिक रचना दोन्ही संप्रदायांना समान आदर देतात असे त्यांच्या रचना अभ्यासल्यावर दिसून येते.[३]

जीवन[संपादन]

ज्येष्ठ पौर्णिमेस एका ब्राह्मण विधवेच्या पोटी एक पुत्र जन्मला पण उजळ माथ्याने त्याचे पालनपोषण करणे शक्य नाही म्हणून तिने काशीतील एका सरोवराच्या ( लहरतारा ) काठी त्याला टाकून दिले. कर्मधर्म संयोगाने काशीतल्या एका मुस्लिम जोडप्याला तो सापडतो.  त्या मुस्लिम जोडप्यांचे नाव निरू व निमा असते. त्यांनी त्या मुलाचे चांगले पालनपोषण केले आणि पुढे हाच मुलगा कबीर या नावाने प्रसिद्ध झाला. कबीर जरी मुस्लिम कुटूंबात रहात होते तरी ते रामाचे उपासक होते. संत कबीर यांच्या बद्दलची कोणतीही ठाम महिती नाही पण असे म्हणतात की त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते व त्यांना एक कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची एक मुलगी होती.कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण त्यांचा मृत्यू काशीत नसून मगहर येथे झाला, हे स्वतःच त्यांनी सांगितले आहे.[२]

"सकल जनम शिवपुरी गंवाया।

मरती बार मगहर उठि आया।"

त्यांचा मृत्यू इ.स. १५९८ साली झाला असे मानले जाते. मगहर मध्येच मुस्लिम प्रथेनुसार त्यांचे दफन झाले असावे.

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते.[४][५]

भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.[६]

पोस्ट तिकीट

कबीरांविषयी मराठीतील पुस्तके[संपादन]

 • आदि श्री गुरुग्रंथसाहेबातील कबीर (संजय एस. बर्वे)
 • कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद, मंगेश पाडगावकर)
 • कबीर उपदेश (गजानन बुक डेपो प्रकाशन)
 • संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक ११-६-२०१७)
 • कबीरवाणी (संत कबीरांच्या ५०० दोह्यांचा अर्थ, प्रा. रतनलाल सोनग्रा)
 • कबीरवाणी (संत कबीरांच्या दोह्यांचा अर्थ, डॉ. नलिनी हर्षे)
 • कबीर ज्ञानामृत : संत कबीरांचे १००८ दोहे ( स.ह. जोशी; गजानन बुक डेपो प्रकाशन)
 • कबीरायन (कादंबरी, डॉ. भारती सुदामे)
 • कहत कबीर (डॉ. मोहन विष्णू खडसे)
 • कहत कबीर (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक २-११-२०१५)
 • कहै कबीर दीवाना (ओशो)
 • कहै कबीर मैं पूरा पाया (ओशो)
 • भक्त कबीराच्या गोष्टी (शंकर पां. गुणाजी)
 • भक्तीत भिजला कबीर (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
 • भारतीय परंपरा आणि कबीर (पद्मजाराजे पटवर्धन)
 • भारतीय साहित्याचे निर्माते - कबीर (प्रभाकर माचवे)
 • माझे माझ्यापाशी काही नाही (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
 • मृत्यु अमृताचे द्वार (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - मीना टाकळकर)
 • म्हणे कबीर दिवाणा (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
 • संत कबीर (मूळ लेखक प्रेमचंद ‘महेश’, मराठी अनुवाद - विद्याधर सदावर्ते)
 • संत कबीर - एक दृष्टा समाजसुधारक (डाॅ. मानसी विजय लाटकर)
 • संत कबीर यांची अमृतवाणी (गजानन बुक डेपो प्रकाशन)


संदर्भ[संपादन]

 1. ^ The Editors of Encyclopaedia Britannica. "Kabir INDIAN MYSTIC AND POET". https://www.britannica.com. 28.12.2019 रोजी पाहिले. 
 2. a b जोशी ,होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००९ पुनर्मुद्रण). भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन. pp. ८०. 
 3. ^ Das, Subhamoy (8.12.2019). "Mystical Saint-Poet Sant Kabir (1440 to 1518)". https://www.learnreligions.com. 28.12.2019 रोजी पाहिले. 
 4. ^ "कबीर जयंती". https://www.bharatdarshan.co.nz. २८.१२.२०१९ रोजी पाहिले. 
 5. ^ "कबीर जयंती". भारत कोश. २८.१२.२०१९ रोजी पाहिले. 
 6. ^ "Indian Saints & poets 1952". http://www.istampgallery.com. 28.12.2019 रोजी पाहिले. 

7.दोहे, Dohe,हिंदी गीत ,दोहे ,कुंडलिया ,रचनाएॅं , बालगीत,ग़ज़ल,हाइकु,मुक्तक-RAJPAL SINGH GULIA

https://www.rajpalsinghgulia.com/?m=1