Jump to content

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
प्रयोजन सामाजिक क्षेत्रातील योगदान
Venue दिल्ली
देश भारत
प्रदानकर्ता डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार
प्रथम पुरस्कार १९९३
शेवटचा पुरस्कार २०१४
Currently held by बाबू लाल निर्मल
अमर सेवा संगम
संकेतस्थळ http://ambedkarfoundation.nic.in/html/awards.html

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार हा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने प्रदान केला जातो.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म शताब्दी वर्ष १९९२ मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[२]

पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती असतात. यासोबत भारताचे मुख्य न्यायाधीश, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, यासह दोन असे व्यक्ती ज्यांचे सार्वजनिक जीवनात मोठे योगदान आहे, अशा व्यक्तींची समिती नेमली जाते.[१]

हा पुरस्कार इ.स. १९९३, १९९४, १९९६१९९८ मध्ये प्रदान केला गेला, त्यानंतर २० वर्षांनी इ.स. २०११, २०१२२०१४चे पुरस्कार २६ मे इ.स. २०१७ रोजी एकत्रित प्रदान करण्यात आले.[३]

उद्देश व निकष[संपादन]

हा पुरस्कार समाजात सामाजिक सदभाव निर्माण करण्यासाठी तसेच शोषित, पीडित आणि मागासवर्गीयांसाठी अभूतपुर्व योगदान देण्यासाठी प्रदान केला जातो. हा पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला, सामाजिक संस्थेला त्यांच्या समाजातील मागासवर्गीयांप्रती केलेल्या कामाच्या सन्मानार्थ प्रदान करण्यात येतो. पुरस्कार विजेत्या व्यक्ती अथवा संस्थेचे नामाकंन त्यांनी केलेल्या कार्याद्वारे समाजात झालेल्या सकारात्मक परिणामावरून केले जाते. मागसवर्गीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेली पावले ही पुरस्कारर्थी निवडीमधील महत्त्वाची बाब आहेत.[१]

स्वरुप[संपादन]

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे आहे. भारताचे राष्ट्रपती हा पुरस्कार प्रदान प्रदान करतात.[१]

पुरस्कार विजेते[संपादन]

वर्ष विजेत्या व्यक्ती/संस्था स्थान
१९९३ नॅशनल इंस्टिट्युट ऑफ सोशल वर्क अँड सोशल सायन्स भुवनेश्वर, ओडीसा
१९९४ रयत शिक्षण संस्था सातारा, महाराष्ट्र
१९९६ रामकृष्ण मिशन आश्रम बास्तर (जिल्हा), मध्य प्रदेश
१९९८ कस्तुरबा गांधी कन्या गुरुकुल वेदारन्यम, तमिळनाडू
२०११ सुखदेव थोरात[४] महाराष्ट्र
२०१२ समता सैनिक दल[४][५] महाराष्ट्र
२०१४ बाबू लाल निर्मल
अमर सेवा संगम[४]
राजस्थान
तमिळनाडू

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d "Dr. Ambedkar Foundation". ambedkarfoundation.nic.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-15 रोजी पाहिले.
  2. ^ "President presents Dr Ambedkar National Award for Social Understanding and Upliftment of Weaker Sections". pib.nic.in. 2018-05-15 रोजी पाहिले.
  3. ^ SHARMA, NIDHI (2017-05-10). "Ambedkar National Award: Shortage of deserving candidates working for upliftment of weaker section". The Economic Times. 2018-05-15 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "सुखदेव थोरात यांना डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2018-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-15 रोजी पाहिले.
  5. ^ ""राष्ट्रपति ने प्रदान किए डा. अम्बेडकर राष्ट्रीय पुरस्कार" Eenadu India Hindi". m.hindi.eenaduindia.com. 2018-05-15 रोजी पाहिले.[permanent dead link]