जळगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हा लेख जळगाव शहराविषयी आहे. जळगाव जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?जळगाव
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
गुणक: 21°01′00″N 75°34′00″E / 21.0167°N 75.5667°E / 21.0167; 75.5667
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २०९ मी
जिल्हा जळगाव
लोकसंख्या ३,८४,५९० (२०12)
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +त्रुटि: "91(257)" अयोग्य अंक आहे
• MH 19

गुणक: 21°01′00″N 75°34′00″E / 21.0167°N 75.5667°E / 21.0167; 75.5667

जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, दाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत.

जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिध्द अजिंठा लेणी आहेत.जळगावला मराठवाडाचे प्रवेशद्वार म्हणतात.

इतिहास[संपादन]

जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे सातार्‍याचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते. भोईटे बर्‍याच काळापर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाडयाला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते.

मराठा साम्राज्य[संपादन]

स्वातंत्र्ययुद्ध[संपादन]

भूगोल[संपादन]

जळगाव शहर हे समुद्र सपाटीपासून साधारणतः २०९ मीटर उंचीवर आहे. गिरणा नदी शहराच्या पश्चिमी भागातून वाहते.

काव्य रत्‍नावली चौक
जळगाव जिल्ह्याचा नकाशा

पेठा[संपादन]

उपनगरे व विभाग[संपादन]

 • जिल्हा पेठ
 • मेहरूण
 • जुने जळगाव
 • नवी पेठ
 • पिंप्राळा
 • बळीराम पेठ
 • महाबळ
 • राम पेठ
 • शनी पेठ
 • शाहूनगर
 • मुक्तताईनगर
 • आदर्शनगर
 • शंकररावनगर
 • निमखेडी
 • खेडी बुद्रुक

हवामान[संपादन]

जैवविविधता[संपादन]

अर्थकारण[संपादन]

प्रशासन[संपादन]

नागरी प्रशासन[संपादन]

जळगाव शहर हे महानगर असून येथील प्रशासकीय कारभार महापालिकेमार्फत चालविला जातो. महापालिकेची प्रशासकीय इमारत १७ मजली आहे.

जिल्हा प्रशासन[संपादन]

अधिक माहितीसाठी पहा - जळगाव जिल्हा

जळगाव शहर हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकारकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकांचे व्यवस्थापन करणे हे असते.

महानगर पोलीस यंत्रणा[संपादन]

राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस. अधिकारी हा जळगाव पोलीस खात्याचा मुख्य आहे. त्यामुळे इथली पोलीसव्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत ये्ते.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

लोहमार्ग[संपादन]

जळगाव हे एक जिल्ह्यातले महत्वाचे रेल्वे जंक्शन असून ते भारतातल्या मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांसोबत रेल्वेमार्गाने जोडले गेले आहे. तसेच जिल्ह्यातले भुसावळ, चाळीसगावपाचोरा हीही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते.

हवाई मार्ग[संपादन]

जळगाव शहरात विमानतळ असून त्यास नुकतीच प्रवासी विमान उड्डानाची परवानगी मिळाली आहे. जळगांव ते मुंबई विमानसेवा नुकतीच सुरु झाली आहे. एअर डेक्कन या एअरलाईने ही सेवा सुरु केली आहे.

रस्ते[संपादन]

जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (सुरत-धुळे-एदलाबाद-नागपूर) जातो. तसेच जिल्ह्यातली महत्वाची शहरेही राज्य महामार्गांनी जोडली गेली आहेत.

लोकजीवन[संपादन]

जळगावात मराठी बोलली जाते. अनेकजण मराठी ऐवजी अहिराणी नावाची बोलीभाषा बोलतात.काही ठिकाणी वऱ्हाडी बोली भाषा सुद्धा बोलली जाते.

संस्कृती[संपादन]

रंगभूमी[संपादन]

चित्रपट[संपादन]

जळगाव अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत मराठी, हिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. जळगाव स्थानकाजवळील रिगल, मेट्रो , नटवर इत्यादी मल्टीप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने अशोक आणि राजकमल या चित्रपटगृहांत पहायला मिळतात.

धर्म- अध्यात्म[संपादन]

 • संत मुक्तताई
 • चांगदेव
 • खान्देश निवासिनी माता मनुदेवी
 • ओमकारेश्वर मंदिर
 • पद्मालय
 • सप्तश्रुगी माता मंदिर शिरागड़(लहान गड)

खाद्यसंस्कृती[संपादन]

वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी, शेव भाजी प्रसिद्ध आहे.याच बरोबर हिंदु लेवा पाटिदार या समाजात सणांच्या वेळी देण्यात येणाऱ्या भंडाऱ्यात वरण बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजी खूप प्रसिद्ध आहे.

प्रसारमाध्यमे[संपादन]

शिक्षण[संपादन]

उ.म.विद्यापीठ

प्राथमिक व विशेष शिक्षण[संपादन]

उच्च शिक्षण[संपादन]

जळगावातील महत्त्वाची महाविद्यालये[संपादन]

महाविद्यालये
 • मुलजी जेठा महाविद्यालय
 • नुतन मराठा महाविद्यालय
अभियांत्रिकी महाविद्यालये
 • शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
 • SSBT's College of Engineering and Technology
 • Godavari College of Engineering
 • G.H Raisoni Institute of Engineering and Management
 • Shri Gulabrao Deokar College of Engineering and Polytechnic
 • Government Polytechnic, Jalgaon
वैद्यकीय महाविद्यालये व्यवस्थापन महाविद्यालये
 • KCE's Institute of Management and Research
इतर शाळा

संशोधन संस्था[संपादन]

खेळ[संपादन]

पर्यटन स्थळे[संपादन]

उनपदेव-सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे, पालयावल अभयारण्य, पद्मालय येथील गणेश मंदिर, चाळीसगाव तालुक्यातील कालीमठ, पाटणादेवी, वालझिरीगंगाश्रम, पाल थंड हवेचे ठिकाण.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जळगावपासून दक्षिणेस ५५ km अंतरावर स्थित आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]