काळाराम मंदिर सत्याग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च इ.स. १९३१ रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता.

इतिहास[संपादन]

१७८२ साली सरदार रंगाराव ओढेकरांनी सुमारे तीस लाख रुपये खर्च करुन नाशिकात हे मंदिर बांधून घेतले. दरवर्षी रामनवमीला या मंदिरातून रथयात्रा निघत असे. मंदिरातील हे रथ स्पृश्य व अस्पृश्य दोघांनी मिळून ओढण्याची प्रथा सुरुवातीपासूनच चालत आलेली होती. पुण्यातील पेशवे माधवराव यांच्या मातोश्री गोपिकाबाई या मुळच्या नाशिकच्या. त्यांच्या माहेरचे आडनाव रास्ते. त्यानी या मंदिराला दोन रथ भेट दिले होते. पुढे त्या दोन्ही रथाची देखभाल व इतर खर्च याची जबाबदारी रास्त्यांवरच होती. असे असले तरी अस्पृश्यांना या देवळात प्रवेश नव्हता. त्यासाठी आंबेडकरांना सत्याग्रह करावा लागला.

२ मार्च १९३० ला बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला, अन तिकडे १२ मार्च १९३० ला महात्मा गांधी यानी दांडीयात्रा सुरू केली. गांधीचा लढा राजकीय होता, तर बाबासाहेबांचा सामाजिक होता.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]