निपाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निपाणी
ನಿಪ್ಪಾಣಿ
भारतामधील शहर
निपाणी is located in कर्नाटक
निपाणी
निपाणी
निपाणीचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 16°24′17″N 74°22′45″E / 16.40472°N 74.37917°E / 16.40472; 74.37917

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा बेळगाव जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,९१९ फूट (५८५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ६२,८६५
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


निपाणी हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील एक नगर आहे. निपाणी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर स्थित असून ते बेळगावच्या ७५ कि.मी. उत्तरेस, तर कोल्हापूरच्या ३८ कि.मी. दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग ४वर आहे. निपाणी येथे मराठी भाषिक रहिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत. निपाणी हे तंबाखूचे एक मोठे व्यापारकेंद्र आहे.

तो मी नव्हेच ह्या प्रसिद्ध मराठी नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र निपाणीचा रहिवासी असल्याचे रंगवले गेले आहे.


लोकदैवते[संपादन]

महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर मात्र कर्नाटकाच्या हद्दीत वसलेल्या निपाणी शहराला दोन्ही राज्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. लोकदैवतांच्या जत्रा (यात्रा) हा या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसरातील यात्रांना "म्हाई" म्हणून संबोधले जाते घोडेश्वर (सुरूपली), हिटणी मलीकवाड या गावामध्ये जागृत समजले जाणारे "म्हसोबा" हे लोकदैवत परिसरातील लोकांच्या श्रद्धेचा, भक्तीचा अविभाज्य भाग आहेत. सुगीचा हंगाम संपल्यावर या दैवतांच्या म्हाया सुरू होतात. पाहुण्यारावळ्यांना, नातेवाईकांना आमंत्रणे धाडली जातात. बकरी, कोंबड्याचे बळी दिले जातात. झणझणीत मांसाहारी जेवण ही वर्षातून एकदा येणारी पर्वणी असते. वरील तीन म्हसोबा हे एकमेकांचे भाऊ आहेत असे मानले जाते. हा म्हसोबा शेत शिवाराचे रक्षण करतो असा समज आहे. या लोकदैवताच्या नावाचे विश्लेषण महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या ग्रंथात मार्मिकपणे केले आहे. म्हसोबा म्हणजे "महासुबा" - एक मोठया सुब्याचा अधिकारी पूर्वीच्या काळी होऊन गेले होते.[ संदर्भ हवा ]