लुंबिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लुंबिनी
नेपाळमधील शहर

Asokalumbini.jpg
लुंबिनी येथील अशोक स्तंभ
लुंबिनी is located in नेपाळ
लुंबिनी
लुंबिनी
लुंबिनीचे नेपाळमधील स्थान

गुणक: 27°29′2″N 83°16′34″E / 27.48389°N 83.27611°E / 27.48389; 83.27611

देश नेपाळ ध्वज नेपाळ
जिल्हा रुपंदेही जिल्हा
लोकसंख्या  
  - शहर ८,४५४
प्रमाणवेळ यूटीसी+०५:४५


लुंबिनी हे नेपाळ देशामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. येथे इ.स.पूर्व ५६३ मध्ये राणी मायादेवीने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला होता. लुंबिनी नेपाळच्या दक्षिण भागात नेपाळ-भारत सीमेजवळ स्थित असून ते भारताच्या गोरखपूर शहरापासून ९५ किमी अंतरावर स्थित आहे. लुंबिनी, बोधगया, कुशीनगरसारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

इ.स. १९९७ साली लुंबिनीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान ह्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत