निर्णयसागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निर्णयसागर छापखाना या पानावरून पुनर्निर्देशित)

निर्णयसागर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मुद्रणालय असून निर्णयसागर ही एक टंकशाळा (टाइप-फाउण्ड्री) तसेच प्रकाशनसंस्थाही होती. जावजी दादाजी चौधरी ह्यांनी ह्या मुद्रणालयाची स्थापना १८६९ साली केली.[१] सुबक आणि वाचनीय देवनागरी टंक तयार करण्यासाठी तसेच मुद्रणासाठी निर्णयसागर प्रसिद्ध होते.

निर्णयसागर टंकशाळा[संपादन]

जावजी दादाजी चौधरी हे त्यांची घरची आर्थिक स्थिती बरी नसल्यानेे साधारणतः वयाच्या दहाव्या वर्षापासून अमेरिकन मिशन प्रेसमध्ये मुद्राक्षर (टाइप) घासण्याचे काम करत असत[२]. त्यांनी त्या कामातले कौशल्य आत्मसात करून घेतले होते. अन्य काही ठिकाणीही काही काळ नोकऱ्या केल्यानंतर आपण स्वतःचीच टंकशाळा काढावी असे त्यांनी ठरवले[३]. १८६४ च्या सुमारास जावजींनी स्वतःची टंकशाळा सुरू केली[४]. राणूजी रावजी आरू हे त्यांचे सहकारी होते.


या छापखान्यातून अनेक संस्कृत-मराठी ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे मराठी-गुजराथी पंचांगही प्रसिद्ध होत असे. आजही निर्णयसागर हे हिंदी पंचांग मध्य प्रदेशातील नीमच येथून प्रसिद्ध होते[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

संदर्भसूची[संपादन]

  • कुलकर्णी, पुरुषोत्तम बाळकृष्ण. निर्णयसागरची अक्षर-साधना : शेठ जावजी दादाजी ह्यांचें चरित्र.
  • नाईक, बापूराव. भारतीय ग्रंथमुद्रण.