गोदावरी परुळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोदावरी परुळेकर
जन्म: १९०८
मृत्यू: ऑक्टोबर ८, १९९६
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
साम्यवाद
संघटना: भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
पत्रकारिता/ लेखन: जेव्हा माणूस जागा होतो
पुरस्कार: parmvirchakara
पती: शामराव परुळेकर

गोदावरी शामराव परुळेकर (जन्म : १४ ऑगस्ट १९०८; मृत्यू : ८ ऑक्टोबर १९९६) (माहेरचे नाव- गोदावरी गोखले) या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या.

गोदावरी परुळेकर ह्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. त्यांच्या घरात आधुनिक वातावरण होते. बी.ए. एल्‌एल.बी. झालेल्या गोदावरीबाईं कामगार चळवळीत सामील झाल्या. याच काळात साम्यवादी कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

१९१२मध्ये ना.म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद साहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात मोलाची भूमिका पार पाडली. गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास १९१७मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी त्यांची ११ मोफत ग्रंथालये व १० मोफत वाचनालये मोफत चालू होती.

१९४५च्या सुमारास महाराष्ट्र प्रांतिक सभेच्या कामानिमित्त परुळेकर दांपत्य ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वस्तीच्या डहाणू, तलासरी गावात फिरत असताना तेथील आदिवासींचे गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून तेथेच काम करायचे त्यांनी ठरवले. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या शोषणाविरुद्ध सावकार, जमीनदारांविरुद्ध संघर्ष उभारताना आलेले अनुभव या लढ्याची कहाणी, `जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकात गोदावरीबाईंनी चित्रबद्ध केली. 'जेव्हा माणूस जागा होतो' या समाजशास्त्रीय ग्रंथातून त्यांनी जमीनदारांकडे पिढयानपिढया वेठबिगारीने काम करणाऱ्या आदिवासी स्त्री पुरुषांचे केलेले भयानक चित्रण अंगावर शहारे आणणारे आहे. आदिवासी समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून दिल्यावर हा माणूस कसा जागा झाला यावर हा ग्रंथ बेतलेला आहे.यातील ‘वेठबिगारी गाडून टाकली’ या प्रकरणातून आदिवासींच्या कोंडलेल्या भावना जागृत होऊन त्यांच्यात नवचैतन्य कसे निर्माण झाले याचे वर्णन केले आहे. याखेरीज त्यांनी आर्थर रोड, ठाणे, दिल्ली येथील तुरुंगात भेटलेल्या गुन्हेगारावर ‘बंदिवासाची आठ वर्ष’ हे पुस्तक लिहिले

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • जेव्हा माणूस जागा होतो - डहाणू परिसरातील आदिवासींच्या लढ्याचे वास्तव मांडणारे पुस्तक.[१]
  • बंदिवासाची आठ वर्षे - कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे पुस्तक.[१]
  • Adivasis' Revolt : The story of Warli Peasants in Struggle

पुरस्कार[संपादन]

१९७२ चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'जेव्हा माणूस जागा होतो' या पुस्तकासाठी.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. a b संजय वझरेकर. "नवनीत :आजचे महाराष्ट्रसारस्वत : १४ ऑगस्ट". ३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


बाह्य दुवे[संपादन]

मराठी लेखक