देहू रोड
देहूरोड (किंवा देहू रोड) हे पुण्याच्या वायव्येला असलेले पुणे स्टेशनपासून २७ किलोमीटर अंतरावरील लष्कराचे ठाणे आहे. येथे नागरी वस्तीसुद्धा आहे. लष्कराच्या वाहनांसाठी राखून ठेवलेला एक फार मोठ्या विस्ताराचा व्हेइकल डेपो (देहू व्हेइकल डेपो DVD) येथे आहे. तसेच आयुध निर्माणीं देहूरोड येथे भारतीय मजदूर संघ संबद्धित भारतीय संरक्षण कामगार संघ, कामगार संगठन आहे,देहूरोड बाजार येथे(रमनभाई शहा भवन) नावाने भारतीय मजदूर संघाचे कार्यालय आहे. पुण्याहून येथे नोकरीसाठी येणाऱ्या लोकांसाठी येथे रेल्वे स्थानक आहे. पुणे-मुंबई महामार्ग देहूरोड गावातून जातो. संत तुकारामांच्या देहू गावाला जाण्यासाठी येथून रस्ता आहे, म्हणून या स्टेशनचे आणि त्यावरून गावाचेही नाव देहू रोड पडले. त्याअर्थाने देहूरोडला पुण्याचे उपनगर समजले जाते. प्रत्यक्षात तसे नसले तरी, देहूरोड येथे नोकरी करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुण्यात मिळतात ते सर्व भत्ते मिळतात.
रक्षा मंत्रालयाच्या कामगार विरोधी निर्णया विरुद्ध आयुध निर्माणृी,डेपो,आर्मीबेस वर्कशाप,मिलिट्री इनिर्जिर सर्विस तसेच ईतर विभागातील खाजगीकरण. नवीन कर्मचारी जे 2004 नंतर भरती झाले आहे त्याची नवीन पैंशन रद्द करून जुन्या पैंशन लागु करण्यासाठी मजदूर हिताच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी रक्षा मंत्रालय मान्यता प्राप्त तीन महासंघाच्या तीन दिवसीय संप दि.23-24-25/2019 करण्यात आला. त्यात संपात सहभाग न घेतल्याने TUCC संबंधित OFEU युनियनची मान्यता सेंट्रल ट्रेड युनियन (TUCC) ने मान्यता रद्द केली आहे.
इतिहास
[संपादन]भौगोलिक सीमा
[संपादन]देहू रोड 600 मीटर (2,000 फूट)च्या उंचीवर आहे. हे गाव उत्तर दिशेला इंद्रायणी नदी आणि दक्षिण दिशेला पवना नदी ह्या मध्ये वसले असून ह्या दोन नद्या दक्षिण-पूर्व दिशेने वाहणाऱ्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. समुद्रसपाटी पासून असलेल्या उंचीमुळे येथे वातावरण चांगले असते. [1]
हे छोटे शहर आहे ज्यामध्ये देहूरोड मार्केट यार्ड, विकास नगर, मामुर्डी, रावेत, आदर्श नगर, बापूदेव नगर, चिंचोली, इंद्राणी दर्शन, किवळे, संकल्प नगर, साई नगर, गहूंजे, बारलोता नगर, दत्त नगर, अशोक नगर, अल्कापुरी,आयुध निर्मिती कारखाना कर्मचारी क्वार्टर, केव्ही स्कूल क्वार्टरस्, गार्डन सिटी, गांधी नगर, मेहता पार्क, सर्वता नगर, बापदेव नगर, थॉमस कॉलनी, शीतला नगर, संकल्प नागरी, उत्तम नगर, श्रीनगर, माउंटबटन (एमबी) कॅम्प, किनही, झेंडे माळा, सिद्धार्थ नगर, शेलारवाडी, इत्यादी. विकास नगर परिसरात झालेल्या प्रगतीमुळे या शहरातील सर्वात घनदाट व वेगाने विकसीत करणारे क्षेत्र बनवले आहे. रावेत येथे एक नवीन टाउनशिप बांधकाम चालू आहे. [2]
महत्त्वाची ठिकाणे
[संपादन]देहू रोड स्थानक देहू गाव आणि देहू रोड छावणीत प्रवेश प्रदान करण्यासाठी बांधले होते या स्थानकामध्ये 4 फलाट आणि 6 लाईन जोडलेले फुटब्रिज् आहेत. मुंबई सीएसटी - कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मुंबई सीएसटी - विजापूर पॅसेंजर, मुंबई सीएसटी - पंढरपूर पॅसेंजर, मुंबई सीएसटी - शिर्डी पॅसेंजर आणि पुणे जंक्शन - कर्जत शटल येथे थांबते. पुण्याच्या सर्व उपनगरीय गाडयांसाठी हे स्थानक एक थांबा आहे. [7] देहूरोड स्थानक एक जंक्शन बनण्याचा अनुमान आहे.
गहुंजे येथे देहू रोडवरील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नावाचे एक आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे. येथे याआधीच आयपीएलचे अनेक सामने आयोजित केले आहे. [11] या स्टेडियमच्या बांधणीमुळे देहू रोडमधील जमिनीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
उद्याने आणि टेकड्या
[संपादन]धम्मभूमी
[संपादन]या ठिकाणी २५ डिसेंबर इ.स. १९५४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्यापूर्वी पहिली बौद्ध मूर्ती वसवली. म्हणून या ठिकाणाची ओळख धम्मभूमी म्हणून आहे.
मशिदी
[संपादन]- ईदगाह मशीद
- जामा मशीद
वाहतूक
[संपादन]नव्याने बांधलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्ग देहू रोडच्या जवळ कात्रज देहू बाह्यवळण मार्ग जंक्शनजवळच संपत आहे. कात्रराज-देहूरोड बाह्यवळण मार्ग मुंबई कडून बंगलोरला राष्ट्रीय महामार्ग ४ वरून जाणारी वाहतूक पुण्या बाहेरून ह्या देहू रोड गावामार्गे कात्रज आणि नवीन बोगदा मार्गे वळवतो. देहू रोड हे गाव पुणे आणि लोणावळापासून जवळजवळ समांतर आहे आणि चाकण आणि कात्रज पासून सुद्धा समांतर अंतरावर आहे. देहू रोड गावाला पुण्याहून [4] [5] [6] रस्ता, उपनगरीय सेवा, रिक्षा, कॅब किंवा बसने जाऊ शकते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
[संपादन]संस्था
[संपादन]शिक्षण
[संपादन]- देहूरोडमधील शाळा
- आर्मी पब्लिक स्कूल
- केंद्रीय विद्यालय क्र. १ (हिंदी-इंग्रजीमाध्यम)
- गॅरिसन हायस्कूल (नवीन नाव सेंट ज्य़ूड हायस्कूल) (??माध्यम)
- शिवाजी विद्यालय (मराठी माध्यम)
- सॅम्सन मेमोरियल रिपब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम)
संस्कृती
[संपादन]छावणी शहराप्रमाणेच, देहूरोडमधील लोकसंख्या ही भारतातील विविध राज्यांमधून (बहुतेक दक्षिण भारतीय राज्ये) आलेल्या लोकांमुळे अतिशय वैविध्यपूर्ण आहे. 2011च्या भारताच्या जनगणनेनुसार, [8] देहू रोडची लोकसंख्या 48, 961 इतकी होती. पुरुषांची संख्या लोकसंख्येच्या 53% व महिलांची संख्या 47% आहे. देहूरोडचा सरासरी साक्षरता दर 90.96% होता, जो राष्ट्रीय सरासरी 74.04 % पेक्षा अधिक आहे. पुरुष साक्षरता 94.80% तर स्त्री साक्षरता 86.63% होती आणि 11.64% जनता 6 वर्षांपेक्षा कमी होती. [9]