विठ्ठल लक्ष्मण कोतवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हुतात्मा भाई कोतवाल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल हे रायगड जिल्ह्यातील समाजसेवक व स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी सशस्त्र क्रांतीचाही अवलंब केला.[१]

माहितीचौकट चळवळ चारित्र
टोपणनाव: विठ्ठल लक्ष्मण कोतवाल
जन्म: १ डिसेंबर, इ.स. १९१२[२]
मृत्यू: २ जानेवारी, इ.स. १९४३


जन्म व शिक्षण[संपादन]

हुतात्मा भाई कोतवाल यांचे माथेरान हे जन्मस्थान होय. एल.एल.बी झालेल्या भाईंनी देशप्रेमाने प्रभावित होउन स्वतःला देशकार्यास वाहून घेतले.

सामाजिक कार्य[संपादन]

सशस्त्र क्रांतीकार्य[संपादन]

शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी झटत असलेल्या भाईंनी सशस्त्र क्रांतिचा मार्ग अंगीकारला. रायगड परिसरामध्ये त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली. भाई व त्यांचे साथीदार हिराजी पाटील, भास्कर तांबट, भगत मास्तर, यशवंत क्षीरसागर, बंडोपंत क्षीरसागर, चांदोबा देहेरकर यांनी संदेशवहन व विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तोडून, इंग्रजांची दळणवळण व्यवस्था कोलम्डून टाकण्यासाठी तारा वाहून नेणारे डोंगरांवरचे मनोरे (पायलन)पाडायला आरंभ केला. उतरणीवर असलेल्या मनोऱ्याचे वरच्या अंगाचे तीन पाय कापले की उतरत्या भागाकडील पायावर सर्व भार पडून मनोरा कोसळून जमीनदोस्त होत असे. मनोऱ्यावरील तारा तुटताच वीजपुरवठा खंडीत होत असे, संदेशवहन बंद पदत असे. १ जानेवारी १९४३ रोजी एका फितुराने दिलेल्या खबरीवरून पोलीस अधिक्षक हॉल स्वतः जातीने १०० सशस्त्र पोलीस घेऊन नेरळपासून (ता. कर्जत) जवळ असलेल्या सिद्धगडावर आला आणि त्याने गडाला वेढा घातला. गडावरील क्रांतिकारकांना दूध देण्यासाठी जाणाऱ्या गवळ्याचा पाठलाग करत पोलिस गडावर पोहचले व त्यांनी गोळीबार सुरू केला. भाई आणि हीराजी पाटील यानी मोठ्या शिळेआड लपून अखेरपर्यंत प्रतिकार केला. दोन तास झालेल्या चकमकीनंतर भाई व हीराजी यांना हौतात्म्य प्राप्त झाले. जखमी भगत मास्तर तिसऱ्या दिवशी शहीद झाले.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ महाराष्ट्र राज्य गॅझेटियर : रायगड जिल्हा (मराठी मजकूर). दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन. १९८९. pp. १८४ ते १८८. 
  2. ^ ग्रेट मराठी. "इंग्रजांविरुद्ध स्वतःच्या तालुक्याचं सरकार बनवणारा माणूस – भाई कोतवाल". http://greatmarathi.com/. 26 जानेवारी 2020 रोजी पाहिले. 
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.