तेलंगणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेलंगणा
తెలంగాణ
भारताच्या नकाशावर तेलंगणाचे स्थान.
भारताच्या नकाशावर तेलंगणाचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना २ जून २०१४
राजधानी हैदराबादगुणक: 18°N 39°E / 18, 39
सर्वात मोठे शहर हैदराबाद
जिल्हे १०
क्षेत्रफळ १,१४,८४० चौ. किमी (४४,३४० चौ. मैल) (१२ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
३,५२,८६,७५७ (१२वा)
 - ३१० /चौ. किमी (८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

ई.एस.एल. नरसिंहन
के. चंद्रशेखर राव
[[विधानसभाविधान परिषद]] (११९ + ४०)
हैदराबाद उच्च न्यायालय
राज्यभाषा तेलुगू, उर्दू
आय.एस.ओ. कोड IN-TG

तेलंगणा (लेखनभेद: तेलंगण किंवा तेलंगाणा) भारताचे २९वे राज्य आहे. जून २, इ.स. २०१४ रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशावी प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती.

तेलंगणा भौगोलिक दृष्टया मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे. तांदूळ हे मुख्य पीक असलेला हा प्रदेश गोदावरी खोऱ्यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन (इ.स.पू. २२१ - इ.स. २१८), गोवळकोंड्याची कुतुबशाही (इ.स. १५२० - इ.स. १६८७) आणि हैदराबादचा निजाम (इ.स. १७२४ - इ.स. १९४८) यांच्या सत्तेखाली राहिला. इ.स.च्या विसाव्या व एकविसाव्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचारप्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर इ.स. १९४८ साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला. हैदराबाद ही तेलंगणा ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर तेलगू ही प्रमुख भाषा आहे.

तेलंगणा राज्याचे जिल्हे

इतिहास[संपादन]

तेलंगणा हे वेगळे राज्य घोषित करण्यात यावे, यासाठी अनेक वर्षे तेलंगण राष्ट्रीय समितीने लढा चालवला होता. डिसेंबर ९, २००९ रोजी या प्रयत्नांना यश येऊन भारत सरकारने तेलंगणा हे वेगळे राज्य होणार असल्याचे जाहीर केले. तेलंगण राज्याच्या स्थापनेसाठीचे विधेयक १५ व्या लोकसभेत १८ फेब्रुवारी २०१४ ला आणि राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात २० फेब्रुवारी २०१४ ला संमत करण्यात आले आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.

तेलंगणा राज्यात पुढील जिल्ह्यांचा समावेश होतो: आदिलाबाद जिल्हा, करीमनगर जिल्हा, खम्मम जिल्हा, नालगोंडा जिल्हा, निजामाबाद जिल्हा, मेडक जिल्हा, वारंगळ जिल्हा, रंगारेड्‍डी जिल्हा, महबूबनगर जिल्हाहैदराबाद जिल्हा.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]