विठ्ठल रामजी शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विठ्ठल रामजी शिंदे (एप्रिल २३, इ.स. १८७३; जमखिंडी - जानेवारी २, इ.स. १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक होते.

जीवन[संपादन]

विठ्ठल रामजी शिंद्यांचा जन्म एप्रिल २३, इ.स. १८७३ रोजी वर्तमान कर्नाटक राज्यातील जमखिंडी संस्थानातील मराठी कुटूंबात झाला. त्यांच्या बालमनावर कुटुंबातील उदारमतांचा प्रभाव पडला.

त्यांनी फर्गुसन कॉलेज, पुणे येथून बी.ए. पदवी मिळवली. तसेच त्यांनी कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर एल्.एल्.बी. परिक्षेकरता मुंबईला स्थलांतर केले. त्यानंतर ते प्रार्थना समाजाला सामील झाले. ऑक्टोबर १८ इ.स. १९०६ रोजी त्यांनी डीप्रेस्ड क्लास मिशन संस्थेची स्थापना केली, तसेच इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.

संदर्भ[संपादन]