नागार्जुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
नागार्जुन
Nagarjuna at Samye Ling Monastery.JPG
जन्म इ.स. १५०
दक्षिण भारत
मृत्यू इ.स. २५०
पेशा बौद्ध गुरू व तत्त्वज्ञ
ख्याती महायान पंथाच्या मध्यमक संप्रदाय संस्थापक
धर्म बौद्ध धर्म

नागार्जुन ( इ.स. १५० - निर्वाण: इ.स. २५०) हे भारतीय तत्त्ववेत्ते, खगोलशास्त्रज्ञ, खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, शून्यवादाचे उद्गाते व विद्वान बौद्ध भिक्खू होते. ते महायान बौद्ध पंथाचे एक संघटक होते. नागार्जुन हे प्रख्यात बौद्ध आचार्य तसेच बोधिसत्त्व सुद्धा होते. ते एक तांत्रिक होते असे भारतीय व तिबेटी परंपरा सांगतात. त्यांनी महायान बौद्ध धर्माचा मध्यमक संप्रदाय स्थापण केला. पौर्वात्य जगातील त्यांचा प्रभाव ऐतिहासिक स्वरूपाचा होता.

असे मानले जाते की, आध्यात्मिकता, तार्किक कुशाग्रता आणि आत्मिक मर्मदृष्टी या बाबींमध्ये आद्य शंकराचार्याचा अपवाद वगळता भारतात त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी विचारवंत झाला नाही.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.