Jump to content

आंबेडकरी चळवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंबेडकरवादी चळवळ या पानावरून पुनर्निर्देशित)


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या तत्त्वांवर आधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरू केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळी पुढे आल्या त्यांना आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हणतात. आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचे बदल, परिवर्तन व क्रांती अशीच कल्पना न मांडता पूर्ण परिवर्तनाचा व्यापक विषय मांडतात. या परिवर्तनात सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक अशी नियमावली करता येऊ शकेल. ही संकल्पना संपूर्ण परिवर्तनाची आहे.[१]

इतिहास

[संपादन]

१८९८ मध्ये पेशवाई चा ऱ्हास झाला आणि ब्रिटिश सत्तेवर आले. याच काळात ब्राह्मणी संस्कृती आणि त्याचे दुर्बोध समोर आले. शास्त्र, वेद, पुरणाचा अभ्यास करण्याचा अट्टहास, मृत्यू आणि पुनर्जीवन या संकल्पना, रूढी मंत्रपठन इत्यादी. १८१३ मध्ये ब्रिटिशांनी मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी एक मोहीम सुरू करत शाळा सुरू केली. ब्राह्मणांनी याला तीव्र विरोध केला.महात्मा ज्योतिबा फुले यांनी महार जातीच्या मुलींकरता १८४८ मध्ये मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेत पहिली शाळा सुरू केली, आणि ब्राह्मणी अहंकाराला पेच दिला. कालांतराने हिंदू समाजाला मुलांचे व भिन्न जातीच्या समाजाचे शिक्षणाचे महत्त्व समजू लागले. त्याचबरोबर भिन्न वर्गाच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव झाली.[ संदर्भ हवा ]

आंबेडकरी चळवळीतील विविध पैलू

[संपादन]

सामाजिक पैलू

[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एका शोषित घराण्यामध्ये जन्माला आले होते. लहानपणापासूनच समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भेद भाव पाहत आले होते. समाज सुधारणेची चळवळ ब्रिटिश वसाहत काळात सुरू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती नव्हते कि ज्यांनी उच्च वर्णीयांच्या विरोधात आवाज उठवला होता.[ संदर्भ हवा ]

१९४६-४९ च्या काळात आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना केली, व या रचनेमध्ये प्रामुख्याने शोषित समाजाची प्रगती कशी होईल यावर भर दिला. म्हणूनच त्यांना “भारतीय राज्यघटनेचे शिलपकार” म्हणून संबोधले जाते.

बौद्ध धर्म समानता व बंधुत्त्वा वर आधारित असल्यामुळे, १४ ऑक्टोबर १९५६ ला आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांच्या सोबत त्यांचे लाखो अनुयायांनी देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[ संदर्भ हवा ]

राजकीय पैलू  

[संपादन]

स्वातंत्र्या पूर्वीच्या काळात आंबेडकरांनी १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष आणि १९४२ मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. १९३७ मध्ये स्वतंत्र कामगार पक्षाचे २१ उमेदवार निवडून आले होते. या पक्षांची धोरणे ही सामाजिक व आर्थिक बदल घडवणारी होती. ती प्रामुख्याने मूलगामी, उपयुक्ततावादी आणि सहजदृष्ट्या असणारी होती.[२] १९४६ साली शे.का. (शेड्युल्ड कास्ट) फेडरेशनच्या नेतुत्वाखाली दलित महिलांनी पुणे करार रद्द करण्यासाठी सत्याग्रह केला. स्वातंत्र्योत्तर काळात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी राजकीय हस्तक्षेप करण्यात आला होता त्यावेळी दलित राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.[ संदर्भ हवा ]

सांस्कृतिक पैलू

[संपादन]

शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशी मित्र या वृत्तपत्रातून १ मार्च १९०९ साली आवाहन केले की मुलींना देवदासी करू नये. ज्या मुरळ्या आहेत त्यांच्यासोबत लग्न करण्याची ज्यांची इच्छा/ तयारी असेल, त्यांना जात पंचायतीकडून परवानगी असावी, अशा लोकांनी सह्या करून आम्हास कळवावे. याबाबत सरकारने आयपीसी ३७३ प्रमाणे १६ वर्षाच्या आतील मुलीला वेश्येचा धंदा किंवा कामासाठी विकेल किंवा तसा प्रयत्न केला तर त्यास १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येईल. असा कायदा झाला. १८ एप्रिल १९०९ मध्ये सोमवंशी मित्र पत्रव्यवहार करणाऱ्या शिवूबाई या मुरळीसोबत गणपतराव हनुमंतराव गायकवाड यांनी विवाह केला, व याला सर्व अस्पृश्य समाजाने (महार, मंग, ढोर, चांभार) इ. मान्यता दिली. आंबेडकरी कार्यकर्त्यानी १३ जून १९३६ रोजी देवदासी, मुरळी जोगतीन यांची परळ मध्ये परिषद घेतली व सर्व शोषित वर्गाला आवाहन केले. बाळकृष्ण जानोजी देवरुखकर यांना अस्पृश्य स्त्रियांच्या दुःखाची चांगलीच जाणीव होती आणि समाजात अशा प्रकारची वागणूक मिळणाऱ्या अस्पृश्य स्त्रियांना समान वागणूक मिळावे असेही नमूद केले आहे.[३]

वैचारिक पैलू

[संपादन]

दलित अस्तित्वाच्या जाणीवेच्या ठिणगीचे एका झगझगीत प्रकाशात रूपांतर करून अस्पृश्यांमध्ये लढण्याची जिद्द व समता निर्माण करणे हे आंबेडकरी चळवळीचे मुख्य उद्देश राहिला आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंबेडकरांच्या विचार व मुल्यातून प्रेरणा घेऊन बौद्धिक चळवळ, ग्रंथ, भाषणे, वर्तमानपत्रे इ. दलित उद्द्धराचे काम सुरू केले. बाबासाहेबांनी तेजाचे एक वलय निर्माण केले. ज्याच्या किरणांनी अनेक लेखक, समीक्षक व विचारवंत विविध वैचारिक क्षेत्रांमध्ये निर्माण झाले. काहींनी इतिहासातील दलितांचे शौर्य, कर्तबगारी बौद्धिक संपत्ती यावर संशोधन सुरू केले तर इतरांनी प्रकाशन संस्था स्थापन केल्या.[ संदर्भ हवा ]

कलात्मक पैलू   

[संपादन]

दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरुवात संगीत आणि गाण्यांमधून होणाऱ्या सांस्कृतिक रुढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्या भावनांना जागृत करण्याची क्षमता ही दलित लढा सातत्याने सुरू ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमी ही देखील दलित समजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी उत्प्रेरक ठरली आहे. याची सुरुवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्याने लोकनाट्य, पथनाट्य यातून प्रगत झाले. बी.एस.शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे एकतेची भावना निर्माण करणे हे दलित नाट्याचे प्रमुख उद्देश होय. याव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये देखील आपल्याला जातीविषयक प्रश्नांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते.[४] उदा.फॅन्ड्री, जैत रे जैत.[ संदर्भ हवा ]

लोकशाहीर वामनदादा कर्डक या प्रख्यात शाहीरांनी लिहिले आहे,

“तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे"

ही सर्व गाणी साधी पण शक्तिशाली होती. तरीही, यापैकी बहुतेक लोककलावंत लोकप्रियता प्राप्त नाहीत कारण संस्कृती निर्माण करण्याच्या माध्यमांवर अजूनही उच्च जाती आणि वर्ग यांचे वर्चस्व आहे. तथापि, जनतेवर आणि महाराष्ट्रात विवेकबुद्धी निर्माण करण्याचा त्यांचा प्रभाव अफाट आहे. त्यांच्या गाण्यांसह, शाहीर लोकांपर्यंत पोहोचले ज्यांना ब्राह्मणवादी कल्पनेने नाकारले गेले. शाहीर भीमराव कर्डक यांचा जलसा पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले, "माझ्या दहा सभा व मेळावे आणि कर्डक यांचा एक जलसा समान आहे. ”

बहुजन समाजातील कलाकारांनी बहुजनांच्या प्रबोधनासाठी सादर केलेली कलाकृती म्हणजे जलसा असं त्याचं स्वरूप होतं. समाजातील परिस्थितीचं वर्णन करून लोकशिक्षण, मनोरंजन असं त्याचं स्वरूप होतं. सावकार, ब्राह्मण यांच्या दडपणाखाली हलाखीचं जीवन जगणाऱ्या बहुजन समाजाला जागं करणं, विचार करायला लावणं हे त्याचं उद्दिष्ट होतं.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ 3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलेले भाषण
  2. ^ Political philosophy of B.R. Ambedkar: A critical Understanding, Dr. P. Kesava Kumar
  3. ^ Pawar, Urmilā; Moon, Meenakshi (2008). We Also Made History: Women in the Ambedkarite Movement (इंग्रजी भाषेत). Zubaan. pp. 92–102. ISBN 9788189013127.
  4. ^ "Dalit Theatre and Ambedkar". Forward Press (इंग्रजी भाषेत). 2017-08-15. 2018-07-16 रोजी पाहिले.