Jump to content

डॉ. आंबेडकर हायस्कूल (हंगेरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. आंबेडकर हायस्कूल ही हंगेरी देशातील साजोकाझा शहरातील एक शाळा आहे. जिप्सी समाजाच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन या शाळेची स्थापना इ.स. २००७ मध्ये केली.[]

विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे.

हंगेरीतील जय भीम नेटवर्कने या शाळेला आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. आंबेडकरांचा अर्धपुतळा दिलेला आहे.

इतिहास

[संपादन]

हंगेरीतील जिप्सी समूहाय हा दलितांप्रमाणे कनिष्ठ मानला गेलेला असून त्यांना शिक्षणापासून व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित-अस्पृश्य समूदायाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा जिप्सी लोकांना प्रेरक ठरला व त्यांनी जिप्सी लोकांत बाबासाहेबांचे संघर्ष सांगण्याचे व विचार रूजविण्याचे काम केले तसेच बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्माचाही स्वीकार केला. बाबासाहेबांसारखेच जिप्सी लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी येथे प्रयत्न केले जात आहेत. यातूनच जिप्सी मुलांसाठी येथे 'डॉ. आंबेडकर हायस्कूल' हे उत्कृष्ठ विद्यालय सुरू करण्यात आले.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "First Dr. Ambedkar statue installed at the heart of Europe – Hungary!". Dr. B. R. Ambedkar's Caravan (इंग्रजी भाषेत). 2016-04-15. 2018-05-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Dr. Ambedkar School". www.ambedkar.eu (इंग्रजी भाषेत). 2018-05-11 रोजी पाहिले.