Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९४६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१–१९५६) यांचा जीवनक्रम खालीलप्रमाणे आहे.[]

जीवनक्रम

[संपादन]
इसवी सन दिनांक व महिना वय वर्षे घटना
१८९१ १४ एप्रिल मध्यप्रदेशातील महू (सध्या डॉ. आंबेडकर नगर) येथे जन्म
१८९६ आई भीमाबाईंचे निधन
१९०० ७ नोव्हेंबर साताऱ्याच्या सरकारी शाळेत (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) पहिली इंग्रजी इयत्तेत प्रवेश
१९०४ नोव्हेंबर इयत्ता ४ थी उतीर्ण.
डिसेंबर एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश
१९०६ ४ एप्रिल १४ ९ वर्षीय रमाबाई वलंगकर यांच्यासोबत विवाह. हा विवाह रात्री ९.०० वाजता भायखळा येथील भाजी मार्केट मध्ये पार पडला.
१९०७ ७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा उतीर्ण. केळुस्कर गुरुजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" पुस्तक भेट.
१९०८ ३ जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई विद्यापीठ) प्रवेश
भगवान बुद्धांचे चरित्र वाचून बौद्ध धर्माकडे पहिल्यांदा आकर्षीत
१९१२ १२ डिसेंबर मुलगा यशवंत यांचा जन्म
१९१३ जानेवारी बी.ए. पदवी परीक्षा मुंबई विद्यापीठातून उत्तीर्ण (पारशी आणि इंग्रजी हे मुख्य विषय)
२ फेब्रुवारी वडील रामजी आंबेडकर यांचे निधन
एप्रिल बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी निवड केली
२० जुलै अमेरिकेच्या न्यूयार्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश
१९१४ कोलंबिया विद्यापीठात लाला लजपतराय यांचेशी भेट
१९१५ २ जून “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून एम.ए. पदवी मिळवली. प्रमुख विषय अर्थशास्त्र होता समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र व राज्यशास्त्र हे अन्य विषय
१९१६ जून "नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया – अ हिस्टॉरिकल अँड ॲनॅलिटिकल स्टडी" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारला व पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी प्रदान केली. लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना.
९ मे प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार मध्ये "कास्ट इन इंडिया" हा मानवंशशास्त्रीय व वैचारिक प्रबंध वाचला
ऑक्टोबर अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्स संस्थेत प्रवेश मिळवला
११ नोव्हेंबर कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश
जून बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, त्यामुळे लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले
१९१७ सप्टेंबर बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले
१९१८ साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
१० नोव्हेंबर मुंबईतील सिडनहॅंम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
१९१९ १६ जानेवारी महार’ या टोपण नावाने द टाइम्स ऑफ इंडिया मध्ये लिखाण
१९२० ३१ जानेवारी साप्ताहिक मूकनायक सुरू केले
२१ मार्च माणगाव, कोल्हापूर संस्थान येथे शाहू महाराज अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
मे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले
५ जुलै प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण
बर्टाड रसेल यांनी "प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन" या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित केले.
१९२१ एप्रिल “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व" या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.
जून लंडन विद्यापीठाने "प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया" या प्रबंधासाठी एम.एस्सी. (अर्थशास्त्र) पदवी प्रदान केली
१९२२ एप्रिल अर्थशास्त्रात तिसरी डॉक्टरेट मिळवण्यासाठी जर्मनीतील बॉन विद्यापीठामध्ये गेले
२८ जून ग्रेज इन विद्यापीठाने बार-ॲट-लॉ (बॅरिस्टर ॲट लॉ) पदवी प्रदान केली
ऑक्टोंबर लंडन विद्यापीठात "द प्रोब्लेम ऑफ रुपी" हा प्रबंध डी.एससी' सादर केला
१९२३ एप्रिल जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन पूर्ण केले व भारतात परतले.
४ ऑगस्ट बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने एस.के. बोले यांनी मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.
नोव्हेंबर लंडन विद्यापीठाने डी.एससी. ही डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
१९२४ जुलै २० मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका बैठकीत बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, त्याचे घोषवाक्य "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" होते.
१९२५ ४ जानेवारी उच्च शाळांत शिकणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूरमध्ये वसतिगृह सुरू केले.
१५ डिसेंबर हिल्ट यंगच्या अध्यक्षेसाठी(?) आलेल्या रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.
डिसेंबर
१९२७ जानेवारी मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलवर नियुक्ती केली.
१ जानेवारी भिमा कोरेगांवच्या विजय स्तंभाला भेट दिली. महार सैनिकांना वंदन केले.
मार्च डॉ. आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली.
१९-२० मार्च डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला प्रस्थापित करण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. दि. २०ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन केले.
३ एप्रिल पाक्षिक बहिष्कृत भारत सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली
३ मे कल्याण जवळील बदलापुर गावांत आयोजित शिवाजी जयंती समारोह त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.
८ जून "इवोल्युशन ऑफ प्रोविन्सयल फायनन्स इन ब्रिटिश इंडिया" या प्रबंधासाठी कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी विधिवत (व अधिकृतपणे) प्रदान केली.
४ ऑगस्ट महाड नगरपालिकेने इ.स. १९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.
सप्टेंबर समाज समता संघ स्थापन केला.
१९२८ ऑगस्ट बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला एक मागण्याचा खलिता सादर केला व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.
१९३० ३ मार्च नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरू राहिले.
१७ ते २१ नोव्हेंबर लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर केला.
१९३१ १४ ऑगस्ट मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट.
१९३२ २० ऑगस्ट भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटिश प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला. ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.
२४ सप्टेंबर पुणे करारावर स्वाक्षरी केली.
१९३४ परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
१९३५ २६ मे पत्नी रमाई यांचे निधन
१ जून मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या प्राचार्य पदी नेमणूक.
१३ ऑक्टोबर येवला येथे हिंदू धर्मांतराची घोषणा केली
१९३६ ऑगस्ट स्वतंत्र मजूर पक्ष” नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
१९३७ १८ मार्च मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या, दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल अस्पृशांच्या बाजूने दिला.
१९४० डिसेंबर रमाबाईंना समर्पित असलेले थॉट्स आॅन पाकिस्तान पुस्तक प्रकाशित
१९४२ १८ जुलै आॅल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची नागपूर येथे स्थापना.
२० जुलै व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळावर मजूर खात्याचे मंत्री म्हणून नेमणूक.
१९४५ जून व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल” या ग्रंथाचे प्रकाशन
२० जून मुंबईत दी पीपल्स एजुकेशन सोसायटी तर्फे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
१९४६ ऑक्टोबर हू वेर द शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटनासमितीवर निवडून गेले.
१९४७ २९ ऑगस्ट स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी नियुक्ती
१९४८ फेब्रुवारी घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण.
१५ एप्रिल डॉ. शारदा कबीर (सविता आंबेडकर) यांच्याशी नवी दिल्ली येथे विवाह.
४ नोव्हेंबर घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.
१९५० सप्टेंबर १ मिलिंद महाविद्यालय औरंगाबादची कोनशीला भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसवण्यात आली.
१९५१ ५ फेब्रुवारी भारतीय संसदेपुढे हिंदू कोड बील मांडले.
जुलै भारतीय बौद्ध जनसंघ संस्था स्थापन केली
२७ सप्टेंबर मंत्रीमंडळातील कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड.
१९५२ ५ जून कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) ही पदवी प्रदान केली.
१९५३ १२ जानेवारी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट) ही पदवी प्रदान केली .
१९५४ डिसेंबर म्यानमारमधील रंगून येथे भरलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभागी झाले
१९५६ मे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. प्रबुद्ध भारत साप्ताहिक सुरू केले
जून पीपल्स एजुकेशन सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले.
१४ ऑक्टोबर नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या कडून बौद्ध धम्म दीक्षा घेतली, आणि आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना बासीस प्रतिज्ञा देऊन धम्मदीक्षा दिली
१५ ऑक्टोबर नागपूरात उशिरा पोहचलेल्या २ ते ३ लाख अनुयायांना धम्माची दीक्षा दिली.
नोव्हेंबर नेपाळच्या काठमांडू येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला. तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले.
६ डिसेंबर नवी दिल्ली येथे अलीपूर रोड निवास्थानी महापरिनिर्वाण
७ डिसेंबर मुंबईतील चैत्यभूमी येथे अंतिम संस्कार

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "महामानवाचा जीवनपट !". Loksatta. 2018-04-14. 2018-05-10 रोजी पाहिले.