खोती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खोत[संपादन][संपादन]

खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला 'खोती' असे म्हणत. खोत हा गावातील शेतसारा गोळा करून तो सरकारला देत असे.

खोती पद्धत बहुतांशी कोकणातील रायगडरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आढळून येत होती.

खोतांचे अधिकार[संपादन][संपादन]

एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.

कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.उदा.सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.