डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार हा दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा संस्थेला दिला जातो.[१]

निकष[संपादन]

पुरस्कार विजेता निवडण्याचे काही निकष खालीलप्रमाणे आहेत.[१]

  1. दिल्लीतील अनुसूचित जातींच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थानास प्रोत्साहन देणारे उल्लेखनीय योगदान.
  2. समाजाच्या मुख्य प्रवाहात अनुसूचित जातींच्या एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये प्रयत्न आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी काम
  3. अनुसूचित जातींच्या जीवनावरील गुणवत्तेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव टाकणारे सार्वजनिक काम किंवा जन आंदोलन.

स्वरूप[संपादन]

डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये रोख, यासोबत प्रशस्तिपत्र आणि शाल असे पारितोषिक दिले जाते.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. a b c "Welfare of SC/ST". www.delhi.gov.in. 2018-05-22 रोजी पाहिले.