भारतीय रिझर्व्ह बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय रिझर्व बँक
Reserve Bank of India
भारतीय रिज़र्व बैंक
रिझर्व्ह बँकेचा लोगो भारतीय रिझर्व बँकेचे मुंबईतील मुख्यालय
रिझर्व्ह बँकेचा लोगो भारतीय रिझर्व बँकेचे मुंबईतील मुख्यालय
मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र
अक्षांश - रेखांश १८°५५′५८″N ७२°५०′१३″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "�" अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "�" संबंधी">अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "�", अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "�"
स्थापना इ.स. १९३५
गव्हर्नर उर्जीत पटेल[१]
देश भारत ध्वज भारत
चलन रुपया
गंगाजळी US$300.21 billion (२०१०)
संकेतस्थळ -


भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे. भारतीय रिझर्व बँकेचे कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

प्रमुख उद्देश[संपादन]

भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • भारतीय चलनी नोटांची छपाई नियमित करणे.
  • भारताची गंगाजळी राखणे.
  • भारताची आर्थिक स्थिती राखणे.
  • भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

इतिहास[संपादन]

ह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (हि सूचना/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे?)
हे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.गव्हर्नर[संपादन]

भारतीय नोटा चलन म्हणून स्वीकारण्यास योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकार तर्फे खात्री म्हणून रिझर्व बँकेचे सर्वोच्च अधिकारी गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा लिहितात आणि त्यावर आपली स्वाक्षरी करतात.

सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रील १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०-जून-१९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही.

त्यानंतर स‍र जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१-०७-१९३७ ते दि. १७-०२-१९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर, ते दि. ११-०८-१९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले.

आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत. दि. ०१-०४-१९३५ पासून दि. ०५-०९-२००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. दि. ०३-०९-२०१३ पासून या पदावर रघुराम राजन हे आहेत.

नुकताच, दि. ०४-०९-२०१६ ला उर्जीत पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला आहे.[१]

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]