देवदत्त
Jump to navigation
Jump to search
देवव्रत याच्याशी गल्लत करू नका.
देवदत्त हा एक बौद्ध भिक्खू व बुद्धांचा एक प्रमुख शिष्य होता. हा सुपब्बुध (सुप्रबुद्ध) यांचा मुलगा, गौतम बुद्धांचा चुलत भाऊ आणि आनंदांचा भाऊ होता. देवदत्त हा एक कोलिय आणि शाक्य होता. सुरूवातीला त्याच्या मनात बौद्ध धर्माविषयी खूप आस्था होती मात्र कालांतराने तो बुद्ध विरोधी बनला. बुद्धांच्या भिक्खू अनुयायांपैकी निम्म्या ५०० भिक्खूंना घेऊन त्याने स्वतःचा संघ तयार केला, परंतु नंतर बुद्धशिष्य मोग्गलान याने त्यांच्या संघाचे विघटन करून टाकले. शाक्य हे देवदत्त आणि सिद्धार्थ या दोघांचे नातेवाईक होते असे म्हटले जाते.