भारतीय टपाल सेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय टपाल सेवा
प्रकार भारत सरकारची एकाधिकार सेवा
उद्योग क्षेत्र टपालसेवा पुरवणे
स्थापना १७६४
मुख्यालय नवी दिल्ली
संकेतस्थळ इंडियापोस्ट.जीओव्ही.इन
एक भारतीय टपाल कार्यालय

भारतीय टपाल सेवाः भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स) इंडिया पोस्ट या ब्रँडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात.

इतिहास[संपादन]

सध्याच्या टपालव्यवस्थेची सुरवात सतराव्या शतकात इस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉर्न हेस्टिंग्ज बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना आणि मुंबई आणि मद्रास प्रांताचे देखरेखीचे अधिकार त्यांच्याकडे असताना सन १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन टपालासोबत वापरायला सुरूवात झाली. सुरवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सींअंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला, त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. २०११ पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन मागे पडून, १ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकीटे अस्तित्वात आली.

बँकेत रूपांतर[संपादन]

डिजिटल इंडिया या अभियानांतर्गत, भारत सरकार टपाल कार्यालयांचे रूपांतर बँकांमध्ये करण्यात येणार आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. तरुण भारत,नागपूर - ईपेपर - १३/०१/२०१७ - पान क्र.२, "टपाल कार्यालयांचे ब्बँकांमध्ये रूपांतर, पुढचे पाऊल,". प्रकाशक:नरकेसरी प्रकाशन नागपूर. १३/०१/२०१७ रोजी पाहिले.