Jump to content

हाऊस ऑफ कॉमन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाउस ऑफ कॉमन्सचा लोगो

युनायटेड किंग्डमचे हाउस ऑफ कॉमन्स (इंग्लिश: House of Commons of the United Kingdom of Great Britain and Northern Ireland) हे युनायटेड किंग्डमच्या संसदेमधील कनिष्ठ सभागृह आहे. हाउस ऑफ लॉर्ड्स हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. हाउस ऑफ कॉमन्सचे कामकाज लंडनमधील वेस्टमिन्स्टर राजवाड्यामध्ये भरते. ६५० संसद संख्या असलेल्या हाउस ऑफ कॉमन्सचे सदस्य मतदारसंघांमधून निवडून येतात. भारताच्या लोकसभेची रचना संपूर्णपणे हाउस ऑफ कॉमन्सवर आधारित आहे. देशाचा पंतप्रधान हाउस ऑफ कॉमन्सचा सदस्य असून तो व ती सत्तेवर राहण्यासाठी हाउस ऑफ कॉमन्समध्ये बहूमत सिद्ध करणे बंधनकारक आहे.

चालू संसदेमध्ये बहूमत असलेल्या हुजूर पक्षाचे ३३०, मजूर पक्षाचे २३० व स्कॉटिश नॅशनल पक्षाचे ५४ सदस्य आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 51°29′59.6″N 0°07′28.8″W / 51.499889°N 0.124667°W / 51.499889; -0.124667