विकिपीडिया:चावडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लघुपथ:
विपी:चा
विपी:चावडी
विपी:VP


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

Chavdi-main.PNG
चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
Help-browser.svg
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्र नवाप्रश्न जोडा | वाचा
Wikipedia-logo-v2.svg
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
Edit-find-replace.svg
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठी निवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

Preferences-system.svg
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
Dheya-beta.PNG
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
Dialog-information on.svg
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा

मागील चर्चा


विकिपीडिया समाज[संपादन]

मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच चावडीवर आपले स्वागत आहे. चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी.मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात.जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा.खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे.

विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे.इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते.

 • विकिपीडिया समाज कसा आहे.

विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर

 1. संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात
 2. फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणे देखील अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता
 3. विकिपीडियास संत्रस्त न करता, सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते.

वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.

 • विकिपीडिया समाज काय नाही.
  • आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
  • विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात.
  • विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. सहमती चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
  • विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.
चर्चेचे स्थानांतरण[संपादन]

नमस्कार ,

मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे होतील. दोन चर्चा सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. आणि विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख चर्चा चालू असताना विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवाववे लागले. ता पुर्वीच्या जुन्याचर्चा विदागारात स्थानातरीत केल्या.

वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.

चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे येथे आपले स्वागत आहे.

आपला नम्र

माहितगार (चर्चा) ०३:४३, ३ एप्रिल २०१२ (IST)

नमस्कार, गेली काही दिवस औरंगाबादमधील विविध महाविद्यालयांमधे मराठी विकिपीडियावर लेखन कसे करावे याबाबत मला विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. विद्यार्थ्यांना खाते तयार करणे ही गोष्ट मोठी कठीण जाते. आपल्या सर्वांच्या अनुभवात ही गोष्ट खूप सोपी आहे. पण अजून काही सोपं करता येईल का असे वाटून गेले. कोणत्या विषयावर लिहायचं ? त्यासाठी नवं पान कुठे उघडते ? असं खूप विद्यार्थ्यांनी विचारलं. गेल्या आठ दिवसात मराठी विकिपीडियावर औरंगाबादहून किती खाते उघडली गेली, किती प्रयत्न केल्या गेले. ते जर मला कळले तर आनंद वाटेल. किती चुका झाल्या, सहा वेळेस आपण खाते उघडल्याची नोंद दिसणे, अशा ब-याच गोष्टींमधे विद्यार्थी अडकले होते. मी मदत केलीच पण खुप लिहायला त्यांना प्रवृत्त करता आले नाही. मराठी अक्षरं उमटतात यातच त्यांना खूप आनंद वाटत होता. असो, मजा आली आभार. हे असं इथेच लिहायचं असतं असे समजून हे लिहिलं. चुभुदेघे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (चर्चा)

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे:


नमस्कार,
नेमक्या कोणत्या अडचणी आल्यात हे जर आपण सांगू शकलात तर त्याला कसे काय सोपे करता येईल ते मला पाहता येईल. मी विकिमिडीया तांत्रिक टीम सोबत पण बोलू शकेन अथवा एखादा अँड्रॉइड ऐप पण त्या साठी बनवता येतो का हे पण पाहता येईल. कुपया नेमके वर्क फ्लो मध्ये कि इंटरफेस मध्ये प्रॉब्लेम होतात ते सविस्तर कळवावे.
धन्यवाद - राहुल देशमुख ०७:०३, १ मार्च २०१७ (IST)
राहूल, एका दिवशी एका आयपी वरुन सहा पेक्षा अधिक खाती उघडायची असतील तर मिडीयाविकि डेव्हेलपर्सना फॅब्रीकेटरवर Request for a temporary lift of account creation cap on IPs (2017-02-08) अशा पद्धतीने आठवडाभर आधी विनंती टाकावी लागते, अथवा महाविद्यालयाने प्रचालकांना आधी विद्यार्थ्यांची नाव यादी इमेल सहीत पाठवावी प्रचालकांनी एक एक खाते उघडून विद्यार्थ्यांना त्यांच्या इमेल वर पासवर्ड परस्पर जातील हे पहावे लागते. तरीही काही ऐनवेळी अडचणी उरतात त्यासाठी बिरुटेसर आणि अन्य विषयतज्ञ प्राध्यापकांसाठी खाते विकसक सुविधा उपलब्ध करुन द्यावयास हवी आहे म्हणजे या बाबतीतले प्रचालकांवरचे अवलंबीत्व कमी होऊ शकेल. प्राध्यापक मंडळी सदस्य खाते विकसकाची भूमिका जबाबदारीने पेलू शकतील असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३१, १ मार्च २०१७ (IST)
खाते विकसक हा फ्लॅग स्वीकृती अधिकाऱ्यास देता येत असेल तर प्रशिक्षण शिबिराच्या आधी कार्यशाळेच्या आयोजकास हा फ्लॅग काही मर्यादित काळासाठी देण्याची पद्धत अमलात आणता येईल. जेणे करून आय पी वरील मर्यादेच्या समस्येचे निराकरण होवूशकेल.ह्या साठी एक विशेष विनंती पान आपण सुरु करून देऊ शकू आणि त्यावर प्रस्तावा सहित विनंती टाकून हा अधिकार मर्यादित स्वरूपात देता येईल.- राहुल देशमुख ००:०९, २ मार्च २०१७ (IST)

नमस्कार, मला असं वाटतं विद्यार्थ्यांना एक तर अक्षरांतरण हे शोधता आले नाही त्यामुळे इंग्रजीत सदस्य नावे टाकली गेली. काहीचे म्हणने होतं की आम्ही तर खातीच उघडली नाहीत मग आमच्या नावाची खाती कशी तयार झालेली आहेत. मला वाटतं विद्यार्थ्यांनी यात चुका केल्या असतील. बाकी, एकदा युजरनेम आणि पासवर्ड टाकला की त्याला इमेल पत्त्यावर जाऊन पुन्हा ते खाते सक्रीय करण्यासाठी त्याची पुष्टी करावी लागते, यात काही तांत्रिक बदल करता येईल का ? एकदा युजरनेम पासवर्ड जाग्यावर टाकलं की सदस्य खातं तिथेच सक्रीय होईल आणि सदस्याला तिथेच लिहिता येईल, असं काही. मला माहित आहे, मला तांत्रिक गोष्टीतल्या अडचणी माहिती नसतांना सहज बोलतोय त्या बद्दल क्षमा असावी. दुसरे असे की मराठी कसे उमटते हीच अजूनही विद्यार्थ्यांसाठी आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट होती. मुख्य बारमधे किंवा कुठे स्पष्ट दिसेल असे मराठीतून लिहिण्याची सोय असं काही बाळबोध वाटणारं वाटलं, तरी लिहिता येईल का असे वाटले. बाकी, सदस्यनामासाठी सहावेळेस प्रयत्न झाला आहे, असे दिसल्यावर मी नवे सदस्यनाम घ्या असे सांगितले. विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनाही लिहायचं खूप आहे. पण लिहायचं कुठं हे अजूनही नेमकेपणाने समजत नाही, यासाठी आपण वर उल्लेख केला तसे काही करता येईल का पाहावे, असे वाटते. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (चर्चा) ४:३५ ७ मार्च २०१७ (IST)

@Rahuldeshmukh101: @माहितगार:

चित्रफित[संपादन]

आपण पानावर चित्रफित जोडू शकतो काय ? संचिका मध्ये चित्रफित अपलोड करण्याची कोणतीही सुविधा दिसत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

श्रीनिवास हेमाडे (चर्चा) १२:४१ , १२ जून २०१७