आमिर खान
आमिर खान | |
---|---|
![]() आमिर खान | |
जन्म |
आमिर हुसेन खान १४ मार्च, १९६५ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९८८ - |
भाषा | हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा |
वडील | ताहिर हुसैन |
पत्नी |
|
अपत्ये | जुनैद, इरा |
अधिकृत संकेतस्थळ | www.आमिरखान.com |
आमिर खान ( १४ मार्च १९६५) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे. गेली सुमारे २५ वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला आमिर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो.
१९७३ साली आलेल्या यादों की बारात ह्या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर १९८४ सालच्या होली ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. कयामत से कयामत तक ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या सत्यमेव जयते ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
आजवर आमिरला अनेक फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला युनिसेफने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने मेधा पाटकर चालवित असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. आमिर खान हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रमुख प्रेरणास्थान मानतो.[१]
पूर्व आयुष्य आणि पार्श्वभूमी[संपादन]
खानचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबई येथे ताहिर हुसैन व झीनथ हुसैन , चित्रपट निर्माता ह्याच्या घरात झाला .त्याचे काही नातेवाईक हिंदी चित्रपट सृष्टीचे सदस्य होते.तो भारतीय तत्त्वज्ञानी अबुल कलाम आझादशी आजीच्या माध्यमातून संबंधित आहे. खान चार भावंडांत सर्वात मोठा आहे; त्याला एक भाऊ,अभिनेता फैजल खान आणि दोन बहिणी फरहात आणि निखात खान आहे.त्याला भौतिकशास्त्र विषय खूप आवडतो.पूतण्या, इम्रान खान, एक समकालीन हिंदी चित्रपट अभिनेता आहे. लहान असताना, खान दोन वेळा लहान भूमिकांसाठी पडद्यावर दिसू लागला. आठ वर्षाचा असताना नसीर हुसैन दिग्दर्शित अत्यंत लोकप्रिय गाणं यादो कि बारात मध्ये दिसला. पुढील वर्षी, त्याने आपल्या वडिलांच्या निर्मित मधहोश चित्रपटात महेंद्रसिंग संधूची तरुण भूमिका निभवलि. खान,च्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी जे.बी. पेटिट शाळेत होता . नंतर त्याने इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षण संत ॲनच्या महाविद्यालयात घेतले आणि इयत्ता नववी व दहावीचे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहीम येथून पूर्ण केले. सत्यमेव जयते हा कार्यक्रमातून खूप पेरणा मिळाली.
प्रेरणास्थान[संपादन]
आमिर खान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रेरणास्थान मानतो. आमिर म्हणतो की, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली नाही. ते निर्भय होते. म्हणून आजही मला अडचणी आल्या किंवा समस्यांना सामोरे जावे लागले. परिस्थिती अत्यंत कठीण झाली की मी बाबासाहेबांची आठवण काढतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहेत.”[२][३][४][५]
चित्रपटयादी[संपादन]
वर्ष | चित्रपट | भूमिका | टीपा |
---|---|---|---|
१९८५ | होली | मदन शर्मा | |
१९८८ | कयामत से कयामत तक | राज | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार |
१९८९ | राख | राख | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार |
लव्ह लव्ह लव्ह | अमित | ||
१९९० | अव्वल नंबर | सनी | |
तुम मेरे हो | शिव | ||
दिल | राजा | ||
दीवाना मुझ सा नहीं | अजय शर्मा | ||
जवानी झिंदाबाद | शशी शर्मा | ||
१९९१ | अफसाना प्यार का | राज | |
दिल है के मानता नहीं | रघु जेटली | ||
१९९२ | जो जीता वही सिकंदर | संजयलाल शर्मा | |
इसी का नाम जिंदगी | छोटू | ||
दौलत की जंग | राजेश चौधरी | ||
परंपरा | रणबीर पृथ्वी सिंग | ||
१९९३ | हम हैं राही प्यार के | राहुल मल्होत्रा | |
१९९४ | अंदाज अपना अपना | अमर मनोहर | |
१९९५ | बाझी | अमर दामाजी | |
आतंक ही आतंक | रोहन | ||
रंगीला | मुन्ना | ||
अकेले हम अकेले तुम | रोहीत कुमार | ||
१९९६ | राजा हिंदुस्तानी | राजा हिंदुस्तानी | फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार |
१९९७ | इश्क | राजा | |
१९९८ | गुलाम | सिद्धार्थ मराठे | |
१९९९ | सरफरोश | अजय सिंग राठोड | |
मन | देव करन सिंह | ||
१९४७: अर्थ | दिल नवाझ | ||
२००० | मेला | किशन प्यारे | |
२००१ | लगान | भुवन | फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार |
दिल चाहता है | आकाश मल्होत्रा | ||
२००५ | मंगल पांडे | मंगल पांडे | |
२००६ | रंग दे बसंती | दलजित "डज " सिंग / | फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार |
फना | रेहान | ||
२००७ | तारे जमीन पर | रॅम शंकर निकुंभ | फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार |
२००८ | गजनी | संजय सिंघानिया | |
२००९ | ३ इडियट्स | रणछोडदास "रांचो " शामलदास चांचंद / | |
२०११ | धोबी घाट | धोबी घाट | |
२०१२ | तलाश | सुर्जन सिंग शेखावत | |
२०१३ | धूम 3 | साहिर खान /समर खान | |
२०१४ | पी.के. | पी.के. | |
२०१६ | दंगल | महावीर सिंग फुगत |
संदर्भ[संपादन]
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2016-04-10. 2018-03-10 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान". Lokmat. 2016-04-10. 2018-03-10 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान - Lokmat | DailyHunt". DailyHunt (इंग्रजी भाषेत). 2018-03-10 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2016-04-10. 2018-03-10 रोजी पाहिले.
- ^ AWAAZ INDIA TV (2016-04-10), Aamir Khan Speech on Dr. Bababsahab Ambedkar, 2018-03-10 रोजी पाहिले
बाह्य दुवे[संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील आमिर खान चे पान (इंग्लिश मजकूर)