सातारा
साताऱ्यातील प्रमुख पर्यटनस्थळे:
कास पठार - विविध रंगांची, विविध आकारांची फुले येथे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. सण-२०१२ मध्ये कास पठाराला "जागतिक वारसा" म्हणून संबोधले गेले आहे. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. पर्यटकांसाठी घाटाई फाटा येथे विनामूल्य वाहन स्थळ उपलब्ध आहे. वाहन स्थळापासून पुष्प पठारावर जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.
कास पठारावरील रस्त्यावर फिरण्यासाठी सह्शुल्क सायकलची व्यवस्था आहे. कास पठारावर घाटाई देवी,कास तलाव, वजराई धबधबा, सह्याद्री नगर पवन चक्की प्रकल्प, एकीव धबधबा, शिवसागर जलाशय इत्यादि प्रेक्षणीय स्थळे आहेत.
ठोसेघर- प्रसिध्द धबधबा आहे
महाबळेश्वर- हे प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे.पावसाळा ऋतू(जून ते सप्टेंबर) सोडून इतर सर्व वर्षभर पर्यटक येथे थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.वेण्णा तलावातील बोअटींगचा अनुभव घेऊन घोडेस्वारी करत महाबळेश्वरची पर्यटन सफारी पूर्ण केली जाते.
अजिंक्यतारा - सातारामधील अजिंक्यतारा किल्ला ११ शतकात दुसरा भोज राजाने बांधला. या किल्ल्यावर आयुर्वेदिक व दुर्मिळ वनस्पती आहेत .
सज्जनगड - रामदासस्वामी यांची समाधी आहे.
उरमोडी धरण पाटण - उंची -१५२.४ फुट लांबी -१३८९ मी. पाण्याची क्षमता -२४,९२५.०० कि मी घन
जरंडेश्वर - हनुमान मंदिर आहे.येथे जाण्यासाठी तीन बाजूंनी रस्ता आहे.एका बाजूने मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत.त्यामुळे ट्रेकिंग करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
औंध -येथील संग्रहालय प्रसिध्द आहे येथे यमाई देवीचे मंदिर प्रसिध्द आहे
शिखर शिंगणापूर- महाराष्ट्राचे कुलदैवत शंभू महादेव मंदिर आहे. जवळच गुप्तलिंग आहे पावसाळ्यात येथील दृश्य पर्यटकांना आकर्षित करते. हे देवस्थान सातारा भोसले घराण्याचे आहे .
पाचगणी- टेबललेंड प्रसिध्द आहे. येथे नामांकित निवासी शाळा आहेत.
वाई - येथिल महागणपती मंदिर प्रसिद्ध आहे.
भिलार- हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.येथे येणाऱ्या प्रत्येक वाचन प्रेमींसाठी गावातील प्रत्येक घरात वाचनासाठी स्वतंत्र खोली आहे आणि विविध विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत.
प्रतापगड- येथे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला .
मेणवली- नाना फडणीस यांचा राजवाडा प्रसिध्द आहे.
मायणी- पक्षी अभयारण्य आहे.
नागनाथवाडी - येथिल नागनाथमंदिर प्रसिध्द आहे.
पाठखळ - पाटखळ माथ्यापासून काही अंतरावर -सात मोटेची विहीर प्रसिद्ध आहे.
तापोळा- नौकाविहार
मांढरदेवी -वाई येथून जवळपास काळूबाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे .या देवीलाच मांढऱ देवी असे म्हनंतात
गोंदवले- येथे गोंदवलेकर महाराज मंदिर प्रसिध्द आहे
कराड - प्रीती संगम हे ठिकाण पर्यटना साठी प्रसिद्ध आहे
कराड - कृष्णा कोयना संगम या ठिकाणी विहंगम दृश्य पहावास मिळते प्रीती संगम म्हणुन प्रसिध्दआहे या ठिकाणी जवळच लेणी आहेत
पाटण- कोयनानगर धरण परिसर
कासतलाव- पर्यटना साठी प्रसिध्द आहे नौका विहार व तीन नदयाचा संगम या ठिकाणी विलोभनीय व निसर्गरम्य परिसर असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो
समर्थ घळ- या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी ध्यान , चिंतन करत
सातारा - या ठीखणी ऐतिहासिक वस्तूचे संग्रहालय आहे
कास तलाव - सातारा शहरासाठी या धरणाच्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात
चितळी | |
---|---|
village | |
Country |
![]() |
State | Maharashtra |
District | Satara |
Taluka | Khatav |
शासन | |
• संस्था | Grampanchayat |
लोकसंख्या (२०११) | |
• घनता | /किमी2 (/चौ मै) |
Languages | |
• Official | Marathi |
वेळ क्षेत्र | IST (यूटीसी+5:30) |
PIN | 415538 |
Telephone code | auto |
वाहन नोंदणी क्रमांक | MH-11 |
Website | http://www.chitali.com |
स्थान[संपादन]
सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्या मध्ये आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागात हा जिल्हा आहे. उत्तरेस निरेच्या प्रवाहाने पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा ठरते. पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगा आहेत जे रत्नागिरी व सातारच्या सीमेवर आहेत. दक्षिणेस सांगली जिल्हा व पूर्वेला सोलापूर जिल्हा आहे.
खाद्यसंस्कृती:
सातारी कंदी पेढे, सुपनेकर वडा, मॅप्रोची उत्पादने याशिवाय असंख्य पदार्थ येथे मिळतात. तसेच साताऱ्यातील खाद्यपदार्था मध्ये चिरोटे हा एक पदार्थ प्रसिध्द आहे.
- ^ "John Distilleries - Manufacturing". John Distilleries. John Distilleries, India. 20 June 2018 रोजी पाहिले.