Jump to content

लहुजी राघोजी साळवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लहुजी वस्ताद साळवे या पानावरून पुनर्निर्देशित)


लहुजी राघोजी साळवे
जन्म: नोव्हेंबर १४, इ.स. १७९४
नारायणपूर, पुरंदर जिल्हा (महाराष्ट्र), ब्रिटिश भारत
मृत्यू: फेब्रुवारी १७, इ.स. १८८१
पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म: हिंदू
प्रभावित: महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके , बाळ गंगाधर टिळक
वडील: राघोजी साळवे
आई: विठाबाई साळवे
पत्नी: नाही

क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. काहीवेळा त्यांचा उल्लेख लहुजी वस्ताद नावाने देखील केला जातो. लहुजींचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या नारायण पेठेमधील पूर्वीच्या मांगवाड्यातील एका हिंदू मांग कुटुंबात झाला.[ संदर्भ हवा ] लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील पुरुषांकडून मिळाले होते.[ संदर्भ हवा ] त्यांचे वडील राघोजी साळवे देखील लढवय्ये होते.[ संदर्भ हवा ]

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज काम करत.[ संदर्भ हवा ] पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती.[ संदर्भ हवा ] त्यांच्या कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना "राऊत" ही पदवी दिली होती.[ संदर्भ हवा ]

दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते.[ संदर्भ हवा ] देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले.[ संदर्भ हवा ] या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.[ संदर्भ हवा ]

२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) [ संदर्भ हवा ] येथे आहे.[ संदर्भ हवा ] .[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]