Jump to content

समाधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समाधी ही संकल्पना पातंजल योग, बौद्धदर्शन तसेच वेदान्त दर्शन यांत प्रामुख्याने वापरली गेली आहे. पातंजल योगात समाधी ही मध्यवर्ती संकल्पना आहे. कैवल्यप्राप्तीसाठी साधकाने करावयाच्या अष्टांगयोग साधनेतील ती शेवटची पायरी मानली गेली आहे.

समाधीचे प्रकार

[संपादन]

समाधीचे अनेक प्रकार असतात. ते प्रकार असे -

सतर्क समाधी

[संपादन]

मन अंतरंगात वळलेले असते आणि तेथे विचार, तर्क, शंका उपस्थित करणे इत्यादी गोष्टी चालू राहतात. []

सविचार समाधी

[संपादन]

या समाधीमध्ये मन तार्किकदृष्ट्या विचार करत नाही तर त्याला बोध होतो. []

स्वप्न-समाधी

[संपादन]

या समाधीमध्ये, निद्रिस्त व्यक्तीला स्वप्नांखेरीज जे आंतरिक अनुभव येतात त्याची जाणीव असते. येथे जाग्रत चेतनेची जागा अंतर्मुख चेतनेद्वारे घेतली जाते. []

सविकल्प समाधी

[संपादन]

निर्विकल्प समाधी

[संपादन]

या समाधीमध्ये सर्व कनिष्ठ इंद्रियांचे क्रियाकलाप थांबलेले असतात आणि केवळ ब्रह्माचा अतिचेतन अनुभव तेवढा शिल्लक राहिलेला असतो.[]

संदर्भ

[संपादन]
अष्टांग योग
यमनियमआसनप्राणायामप्रत्याहारधारणासमाधी
  1. ^ a b c Sri Aurobindo (2001). Record of Yoga. THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 10-11. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
  2. ^ Sri Aurobindo (2013). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.