Jump to content

गंगाधर पानतावणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गंगाधर पानतावणे
जन्म नाव गंगाधर विठोबाजी पानतावणे
जन्म जून २८, इ.स. १९३७
नागपूर
मृत्यू २७ मार्च इ.स. २०१८
औरंगाबाद
शिक्षण डी.सी. मिशन स्कूल, नागपूर
नवयुग विद्यालय, नागपूर
पटवर्धन हायस्कूल, नागपूर
नागपूर विद्यापीठ
मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध धम्म
कार्यक्षेत्र लेखन, संशोधन
भाषा मराठी
चळवळ आंबेडकरवादी चळवळ, अस्मितादर्श चळवळ
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील विठोबाजी पानतावणे
पुरस्कार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (२००६)
फडकुले पुरस्कार (२००८)
मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार (२०११)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार (२०१६)
पद्मश्री पुरस्कार (२०१८)

डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (जून २८, इ.स. १९३७ - २७ मार्च इ.स. २०१८) हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवि-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.

पानतावणे हे आजारामुळे रुग्णालयात दाखल होते तेव्हा २६ जानेवारी २०१८ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे जाहीर केले. २० मार्च रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे पानतावणेकरांना व्यक्तिशः पुरस्कार स्वीकारण्यास हजर राहता आले नाही.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण[संपादन]

गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ रोजी नागपूर मधील पाचपावली वस्तीत झाला. त्यांचे वडील विठोबा जास्त शिकलेले नव्हते परंतु ते बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी चळवळीशी जुळलेले होते. त्यांचे आडनाव 'पानतावणे'चा अर्थ होता पाणी गरम करणारे. गरिबीमध्ये त्यांचे जीवन व्यतीत झाले. गंगाधर यांचे डी.सी. मिशन स्कूल येथे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. त्यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी १९४६ मध्ये बाबासाहेब जेव्हा नागपूरमध्ये आले होते तर त्यांना पाहून ते अतिशय प्रभावित झाले होते. दुसऱ्यांदा जेव्हा बाबासाहेब नागपुरात आले तर त्यांना पानतावणे यांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. १९५६ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गगंगाधर पानतावणे यांनी नागपूर महाविद्यालयातून बी.ए.ची आणि एम.ए.ची पदवी मिळवली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.[१] मराठवाडा विद्यापीठातून ते १९८७ साली पी.एच.डी. झाले. पी.एच.डी.साठी त्यांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर 'पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा शोधप्रबंध लिहिला. त्यानंतर याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.[२]

कारकीर्द[संपादन]

इ.स. १९६३ मध्ये पानतावणे नागपूरहून औरंगाबादमध्ये स्थायिक झाले. आणि तिथल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. औरंगाबादमध्येच त्यांनी साहित्य चळवळ सुरू केली; तिला तरुणांचा आणि विचारवंतांचा मोठा पाठिंबा मिळाला. ‘‘दलित साहित्याने अंधार नाकारला आहे, कलंकित भूतकाळ नाकारला आहे. मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत,’’ अशा शब्दांत दलित साहित्याची पाठराखण करत पानतावणे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांची मोठी फळी घडवली.

पानतावणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी ५० वर्षांपर्यंत कार्य केले आहे. या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक मराठी साहित्यविश्वाला दिले आहेत. पानतावणे यांनी एक दलित लेखक-वाचक मेळावाही भरवला होता'

सॅनहोजे (अमेरिका) येथे पार पडलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. यासोबतच विदर्भ साहित्य संमेलन (आनंदवन वरोरा), मराठवाडा साहित्य संमेलन (परभणी), या व इतर अनेक साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते.

साहित्य, समाज आणि संस्कृती या विषयांवरील त्यांनी एकूण २० वैचारिक व संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले आहेत. याखेरीज १२ पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात त्यांनी शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्यांची लेखणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज ह्यांच्या विचारधारेतून निर्माण झाली आहे.

भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या साहित्य, समाज तथा संस्कृतिविषयक अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केलेले आहे. मराठी भाषेतील व साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे तसेच महाराष्ट्रातील अनेक साहित्यसंस्थांचे ग्रंथपुरस्कार त्यांच्या ग्रंथांना प्राप्त झाले आहेत. पुणे, वाई, नाशिक येथील प्रतिष्ठीत 'वसंत व्याख्यानमाला' तथा महाराष्ट्रातील अन्य व्याख्यानमाला तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध व्याख्यानमालेत त्यांनी महत्त्वपूर्ण व्याख्याने दिली आहेत. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी मराठी साहित्याला दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्तीने सन्मानित केले आहे. तसेच साहित्य अकादमीकडून भारतीय लेखक म्हणून त्यांचा सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना २०१८ सालच्या पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळील बौद्ध लेण्यांवरील विशेष यात्रेची सुरुवात केली.

निधन[संपादन]

शेवटच्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमधील एमआयटी रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णालयात त्यांचे २७ मार्च, २०१८ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.[३]

साहित्यलेखन[संपादन]

पानतावणे यांनी मॅट्रिक झाल्यानंतर लिखाणाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केले आहे.[४][५]

पुस्तके[संपादन]

 • आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता (गोदा प्रकाशन)
 • साहित्य निर्मिती : चर्चा आणि चिकित्सा
 • साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती (स्वरूप प्रकाशन)
 • अर्थ आणि अन्वयार्थ (समीक्षा)
 • चैत्य
 • दलित वैचारिक वाङ्मय (समीक्षा)
 • दुसऱ्या पिढीचे मनोगत
 • धम्मचर्चा
 • पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रतिमा प्रकाशन)
 • मूल्यवेध
 • लेणी (व्यक्तिचित्रे, प्रतिमा प्रकाशन)
 • लोकरंग
 • वादळाचे वंशज
 • विद्रोहाचे पाणी पेटले आहे
 • स्मृतिशेष (व्यक्तिचित्रे, सुविद्या प्रकाशन)

संपादन[संपादन]

पुरस्कार व सन्मान[संपादन]

पानतावणेंना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत.[६]

 • अंकुशराव टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त, महाराष्ट्रातील शिक्षण, साहित्य व तत्त्वज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या विचारवंतांना, मत्स्योदरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (जालना) यांच्या द्वारे दिला जाणारा मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार डॉ.गंगाधर पानतावणे यांना १८ सप्टेंबर २०११ रोजी देण्यात आला.
 • साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य पुरस्कार
 • आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार
 • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार लंडन (इंग्लंड)
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार, २०१६[७]
 • अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
 • किर्लोस्कर जन्मशताब्दी पुरस्कार,
 • कुसुमताई चव्हाण साहित्य पुरस्कार
 • पद्मश्री दया पवार साहित्य पुरस्कार
 • दलित साहित्य अकादमीची गौरववृत्ती
 • नागसेनवन मित्र परिवार सन्मान
 • कै. नानासाहेब नारळकर विद्वत संशोधन पुरस्कार
 • डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार
 • २०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार[८] :
 • फडकुले पुरस्कार[९]
 • फाय फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्कार, हूज हू एशिया
 • फाय फाऊंडेशनची गौरववृत्ती
 • फुले आंबेडकर स्मृति पुरस्कार
 • मराठवाडा लोकविकास मंच मुंबई पुरस्कृत मराठवाडा गौरव पुरस्कार
 • महाराष्ट्र साहित्य परिषदे पुणे पुरस्कृत डॉ. भालचंद्र फडके पुरस्कार
 • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची शिष्यवृत्ती
 • मूकनायक पुरस्कार
 • २००६ मध्ये वाई येथील रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार'[१०]
 • स्वामी रामानंदतीर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार
 • राष्ट्रीय बंधुता पुरस्कार
 • वसंतराव मून स्मृति पुरस्कार
 • प्रा. व.दि. कुलकर्णी साहित्य सन्मान
 • वाई येथील रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (२००६)
 • स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार
 • पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सान होजे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. इ.स. २००९[११]
 • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ गौरववृत्ती
 • राजर्षि शाहू आरक्षण शताब्दी पुरस्कार
 • राम शेवाळकर आधारवड पुरस्कार

संदर्भ[संपादन]

 1. ^ "https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=utYf/MWKOh8=". www.mahanews.gov.in. 2019-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-29 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); External link in |title= (सहाय्य)
 2. ^ "ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन". www.esakal.com. 2018-03-29 रोजी पाहिले.
 3. ^ "veteran marathi literature gangadhar pantawane passes away | डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन - Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-03-27 रोजी पाहिले.
 4. ^ टीम, एबीपी माझा वेब. "ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचं निधन". 2018-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-29 रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
 5. ^ "Books". www.bookganga.com. 2018-03-29 रोजी पाहिले.
 6. ^ "प्रवास पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांचा..." www.esakal.com. 2018-05-18 रोजी पाहिले.
 7. ^ "Nagpur Gangadhar Pantawane felicitated | बाबासाहेबांना हवे होते त्रिभाजन - Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-03-27 रोजी पाहिले.
 8. ^ "dr.gangadhar pantawane | गंगाधर पानतावणे - Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-03-27 रोजी पाहिले.
 9. ^ "| गंगाधर पानतावणे यांना फडकुले पुरस्कार - Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-03-29 रोजी पाहिले.
 10. ^ "https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=utYf/MWKOh8=". www.mahanews.gov.in. 2019-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-29 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); External link in |title= (सहाय्य)
 11. ^ "डाॅ. गंगाधर पानतावणे, बंग दांपत्यासह महाराष्ट्रातील ११ मान्यवरांना पद्म सन्मान". marathibhaskar. 2018-01-26. 2018-03-27 रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे[संपादन]