तत्त्वज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

This template includes collapsible lists.

  • To set it to display all lists when it appears (i.e. all lists expanded), use:
  •  {{तत्त्वज्ञान |expanded=all}} or, if enabled, {{तत्त्वज्ञान |all}}  (i.e. omitting "expanded=").
  • To set it to display one particular list while keeping the remainder collapsed (i.e. hidden apart from their headings), use:
  •  {{तत्त्वज्ञान |expanded=listname}} or, if enabled, {{तत्त्वज्ञान |listname}}
  • …where listname is one of the following (do not include any quotemarks):
  • Branches, Eras, Traditions, Philosophers, Literature, Lists
  • For example, {{तत्त्वज्ञान |expanded=Branches}} or, if enabled, {{तत्त्वज्ञान |Branches}}


तत्त्वज्ञान म्हणजे काय? हा गंभीर प्रश्न आहे. त्याचे उत्तर देण्याचा कोणताही प्रयत्न अपुराच पडतो. विद्यापीठे आणि महाविद्यालयात शिकविला जाणारा एक विद्यामूलक विषय या अर्थाने पाहाता 'तत्त्वज्ञान म्हणजे काय?' याचे अभ्यासक्रम रचता येतात, हे खरे असले तरी 'तत्त्वज्ञान' ही संकल्पना नेहमीच एक खुली संकल्पना असते.

भारतात प्राचीन काळापासून धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले; तर पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाची सुरवात ग्रीक तत्त्वज्ञानाने झाली, असे मान्य झाले आहे.

ढोबळमानाने तत्त्वज्ञान म्हणजे वास्तव, अस्तित्व, ज्ञान, मूल्ये, तर्क, मन आणि भाषा अशा बाबींशी संबंधित सामान्य व मूलभूत समस्यांचा अभ्यास, असे समजले जाते. अशा प्रकारच्या समस्यांचा विचार करणारे जे इतर मार्ग किंवा ज्ञानशाखा आहेत त्यापेक्षा अतिशय भिन्न रीतीने होणाऱ्या चिकित्सकतेमुळे व तर्काधिष्ठित युक्तिवादामुळे तत्त्वज्ञान वेगळे ठरते.

भारतीय आणि पाश्चात्य अर्थाने पाहता, मानव स्वत:च्या अनुभवांची, व्यवहारांची जाणीव असलेला असा प्राणी असल्याने त्याच्या या आत्मजाणीव असणाऱ्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान, असे म्हणता येते.

भिन्न मूलार्थ[संपादन]

'तत्त्वज्ञान' ही संज्ञा इंग्लिशमधील Philosophy चे भाषांतर म्हणून उपयोगात आणली जात असली तरी त्यांचे मूलार्थ वेगवेगळे आहेत. 'तत्त्वज्ञान' आणि Philosophy यात पहिला आणि सहज जाणवणारा फरक असा की 'तत्त्वज्ञान' हा प्राचीन संस्कृत शब्द आहे तर Philosophy हा इंग्लिश भाषेतील शब्द आहे. Philosophy हा इंग्लिश शब्द असला तरी त्याचे मूळ प्राचीन ग्रीक भाषेत आहे. संस्कृत ही वैदिक हिंदूंची भाषा आहे इंग्लिश ही भाषा आहे. या दोन्ही भाषा भिन्न संस्कृतीत विकसित झाल्या. त्यांच्या अर्थात फरक आहे पण तो पूरक मानता येईल.

'तत्त्वज्ञान' ची व्युत्पत्ति[संपादन]

तत्त्वज्ञान ही संज्ञा तत्त्व + ज्ञान अशा संधीने बनते.

तत्त्वज्ञान = तत्त्व + ज्ञान
तत्त्व = तत् + त्व
तत् = ते ( 'ते' हे सर्वनाम)
'तत्' चा तत्पणा (तत्-पणा) = तत्त्व
'तत्त्व' चे ज्ञान = तत्त्वज्ञान

व्याकरण दृष्ट्या 'तत्' + त्व = तत्त्वज्ञान. म्हणजे 'तत्' ला 'त्व' हा भाववाचक प्रत्यय लागून 'तत्त्व' ही संज्ञा बनते. त्यापासून तत्त्वतः, तत्त्वतां = खरोखर हा शब्द बनला. पुढे तत्त्वनिष्ठ = तत्त्वावर निष्ठा असलेला, तत्त्ववादी= तत्त्वाबद्दल वाद करणारा असे शब्द बनतात.[१]तेच तात्त्विक, तत्त्वमसि या संज्ञाबाबत आहे.

येथे' तत्त्व' = म्हणजे पदार्थाचे यथार्थ स्वरूप किंवा त्याचे सार. म्हणून तत्त्वज्ञान पदार्थाचे यथार्थ ज्ञान. यातील तत्त्व ही संज्ञा तत् + म्हणजे ते. ज्याचा ज्याचा निर्देश 'ते' असा करता येतो ती ती प्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटना इत्यादी म्हणजे ते अथवा तत्. म्हणून तत् = सर्वकाही, जे अस्तित्वात आहे ते सर्व म्हणजे अखिल विश्व. 'तत्' चे सार = तत्त्व. म्हणून तत्त्वार्थ = सारतत्त्व. सार याचा अर्थ स्वरूप, स्वभाव. मनुष्याचे सार मनुष्यत्व, पशूचे पशुत्व, खुर्चीचे खुर्चीत्व. या साराचे ज्ञान ते तत्त्वज्ञान. 'तत्' चे ज्ञान ते तत्त्वज्ञान. [२]

अन्य व्युत्पत्तिनुसार 'तत्' धातूला क्त प्रत्यय लागतो. म्हणून 'तत्' म्हणजे ताणलेले, विस्तृत किंवा व्याप्त झालेले. अशा 'तत्' पासून तत्त्वं बनतो. 'तत्त्वं' चा अर्थ वस्तुस्थिती. स्थिती बदलते, विस्तारते. अशा 'तत्त्व' चे ज्ञान ते तत्त्वज्ञान.ते यथार्थ असते. म्हणून तत्त्वज्ञान = यथार्थ ज्ञान [३]

Philosophy ची व्युत्पत्ति[संपादन]

व्याप्ती[संपादन]

तत्त्वज्ञानाच्या आजच्या व्याप्तीमध्ये तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो.

ज्ञानमीमांसा[संपादन]

सत्य, विश्वास व समर्थनाचे सिद्धान्तत यांच्यातील संबंध यांसारख्या ज्ञानाच्या स्वरूप आणि व्याप्तीशी संबंधित गोष्टींचा विचार ज्ञानमीमांसेत केला जातो.

तर्कशास्त्र[संपादन]

समुचित कारणमीमांसेच्या तत्त्वांचा विचार तर्कशास्त्रात केला जातो.

तत्त्वमीमांसा[संपादन]

अस्तित्व, काल, मन आणि शरीर यांच्यातील संबंध, वस्तू व त्यांचे गुणधर्म यांच्यातील संबंध, पूर्ण आणि त्याचे अंश यांच्यातील संबंध, घटना, प्रक्रिया व त्यांची कारणमीमांसा अशा वास्तवाच्या सर्वसाधारण गुणांचा किंवा वैशिष्ट्यांचा अभ्यास तत्त्वमीमांसेत केला जातो.

सौंदर्यशास्त्र[संपादन]

सौंदर्य, कला, आकलन, आस्वाद यांचा विचार सौंदर्यशास्त्र करते.

विशेषीकृत शाखा[संपादन]

 • भाषेचे तत्त्वज्ञान
 • कायद्याचे तत्त्वज्ञान
 • मनाचे तत्त्वज्ञान
 • धर्माचे तत्त्वज्ञान
 • विज्ञानाचे तत्त्वज्ञान

नामव्युत्पत्ती[संपादन]

इंग्रजी "philosophy" ही संज्ञा ग्रीक φιλοσοφία (philosophia), (शब्दशः अर्थ शहाणपण अथवा चातुर्याबद्दल प्रेम) या धातूवर बेतलेली आहे.

इतिहास[संपादन]

प्रमुख परंपरा[संपादन]

उपयोजित तत्त्वज्ञान[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. कृ. पां. कुलकर्णी, मराठी व्युत्पत्ति कोश, शुभदा सारस्वत प्रकाशन, पुरवणी संपादक कै. श्रीपाद जोशी, पुणे पान ३९२, २००४
 2. श्रीनिवास हरि दीक्षित, भारतीय तत्त्वज्ञान, फडके प्रकाशन, कोल्हापूर दहावी आवृत्ती : डिसेंबर २०१०, कोड नं. पी. ५४४८, पान ०१
 3. (कै.) ज. वि. ओक, गीर्वाणलघुकोश, सुधारलेली चवथी आवृत्ती ०१ ऑगस्ट २००२, पान २१९, प्रकाशक – आनंद लाटकर, कॉम्प-प्रिंट कल्पना प्रा. लि. पुणे ३०