दिव्य मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिव्य मराठी
प्रकारदैनिक
आकारमान७४९ बाय ५९७ सेंटिमीटर

मालकरमेशचंद्र अग्रवाल
प्रकाशकदैनिक भास्कर वृत्तसमूह
मुख्य संपादकसंजू पिंपळकर
स्थापनाएप्रिल १, २०१२
भाषामराठी
किंमत४ रुपये
मुख्यालयभारत औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत
खप५५००० हजार
भगिनी वृत्तपत्रे[[]]
[[]]
[[]]

संकेतस्थळ: ईपेपरदिव्यमराठी.भास्कर.कॉम


दिव्य मराठी हे भारताच्या सोलापूर शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.

इतिहास[संपादन]

पहिला अंक[संपादन]

१ एप्रिल २०१२ रोजी दिव्य मराठीच्या सोलापूर आवत्तीची सुरुवा झाली. दैनिक भास्कर ग्रुपचा हा पेपर आहे.

पहिले संपादक मंडळ[संपादन]

रमेशचंद्र अग्रवाल यांनी १९५६ ला दैनिक भास्करची सुरुवात केली.. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र गिरीश अग्रवाल मालक झाले.
दैनिक भास्करचे मुख्यालय भोपाळ येथे आहे. तर दिव्य मराठीचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
दैनिक भास्करचा आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी "The New York Times" (" द न्यूयॉर्क टाइम्स") सारख्या दैनिकाशी सामंजस्य करार झालेला आहे. राज्य संपादकाची धुरा अभिलाष खांडेकर व प्रशांत दीक्षित यांनी सांभाळली. पुढे. संजय आवटे हे राज्य संपादक झाले.संजू पिंपळकर हे सोलापूर आवृत्तीचे स्थापनेपासूनचे निवासी संपादक आहेत.
सोलापूर आवृत्तीत २ वृत्तसंपादक , १२ रिपोर्टर९ उपसंपादक काम करतात. सर्व विभाग मिळून एकूण ७० कामगार आहेत. शहर व जिल्ह्यात दररोज ५५ हजार अंकाचा खप आहे. दिव्य मराठीचे प्रिंटिंग मुळेगाव तांडा- रामदेव वेअर हाऊस येथे केले जाते.

व्हिजन: हा सामाजिक बदल घडवणारा सर्वात मोठा मीडिया ब्रँड आहे.
कोअर व्हॅल्यूजचा वापर वेगवेगळ्या स्थानिक बातम्यांसाठी व लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी केला जातो.
बातम्यांमधून वाचकांना ज्ञान मिळायला पाहिजे व ते दुसऱ्या वर्तमानपत्रापेक्षा वेगळे असले पाहिजे, अशी डिपार्टमेंटल स्ट्रॅटेजी आहे.

'दिव्य मराठी' वृत्तपत्राच्या आवृत्त्या[संपादन]

दिव्य मराठीच्या एकूण ७ आवृत्त्या आहेत.

 1. औरंगाबाद
 2. नाशिक
 3. जळगाव
 4. अहमदनगर
 5. अकोला
 6. अमरावती
 7. सोलापूर

विविध भाषेतून[संपादन]

एकूण ४ भाषेतून प्रसिद्ध होतो १२ राज्यातून ६५ आवृत्या आहेत

 1. हिंदी भाषेत - दैनिक भास्कर
 2. मराठी भाषेत- दिव्य मराठी
 3. गुजराती भाषेत- दिव्य भास्कर
 4. इंग्रजी भाषेत - डी बी पोस्ट ही भोपाळ होऊन प्रकाशित होते


खास वाचकांसाठी[संपादन]

 • राष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, स्थानिक घडामोडी व जिल्हास्तरीय घडामोडींच्या बातम्या.
 • आठवड्याची सुरुवात सकारात्मक विचारांनी न व्हावी म्हणून दिव्य मराठीने दर सोमवारी मंडे पॉझिटिव्ह अंक ही संकल्पना मांडली व तिची अंलबजावणी केली.
 • वाचकांसाठी नेहमी नावीन्यपूर्ण बदल दिले जाते
 • दिव्य मराठीने सामाजिक भान ठेवून महिलांसाठी मधुरिमा हा क्लब स्थापन करण्यात आला. या क्लब मार्फत वर्षभर महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात.
 • फूड फेस्टिव्हलचे आयोजन खास सोलापूरकर खवय्यांसाठी दरवर्षी 22, 23, व 24 डिसेंबर ला आयोजन करण्यात येते. या दरम्यान महाराष्ट्राच्या व कर्नाटकाच्या जिल्ह्यांमधून जवळपास एकूण ३०० स्टॉल भरवले जातात यामध्ये पंढरपूर, बार्शी, पुणे, उस्मानाबाद, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, व बिजापूर या शहरातील लोकांनी सहभाग नोंदवलेले आहेत.
 • दिव्य एज्यूकेशन फेअर या मध्ये १० , १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले जाते. विविध कॉलेजस सहभागी होतात.
 • जिंका १५ कोटी या कार्यक्रमाद्वारे वाचकांसाठी स्पर्धा घेतली जाते. अशा अनेक स्पर्धा वाचकांसाठी वर्षभर राबवल्या जातात

रचना[संपादन]

 • मुख्य अंक हा १४ पाने
 • दिव्य सिटी हा ४ पाने
 • दिव्य सिटी हे दर सोमवार व मंगळवारी ४ पानांचे व बुधवार, गुरुवार ,शुक्रवार, शनिवार व रविवार ६ पानी असते..
 • सोलापूर जिल्ह्यासाठी व सोलापूर सिटीसाठी स्वतंत्र आवृत्त्या छापल्या जातात.

वर्धापन दिन[संपादन]

१ एप्रिल २०१९ रोजी दिव्य मराठीने आपला ७ वा वर्धापन दिन साजरा केला.

संदर्भ[संपादन]


 1. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, तृतीयावृत्ती २००९ किमंत ७५०/-
 2. पत्रकारितेची मूलतत्वे - प्रा. डॉ. सुधाकर पवार : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक १३४०, तृतीयावृत्ती २०१२ किमंत १७५/-

बाह्य दुवे[संपादन]