डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उत्कृष्ठ शासकिय/अनुदानित संस्थासाठी देण्याचे दि. १३ ऑक्टोबर २००३ पासून निश्चित करण्यात आले होते. मागासवर्गीय मुलामुलींना शिक्षणासाठी अधिकाधिक सोयी सवलती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने शासकीय वसतिगृह अनिदानित वसतिगृह व आश्रमशाळा सुरू केल्या असून सदर संस्थेचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने व अधिक जोमाने काम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ही पुरस्कार योजना सुरू केली आहे.

लाभाचे स्वरूप[संपादन]

राज्यस्तरावरील ३ पुरस्कार व विभागीय स्तरावर १ पुरस्कार देण्याचे निश्चित केले असून पुरस्काराची रक्कम विभागीय स्तरावर १ लाख रुपये व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ लाख, ३ लाख, २ लाख रक्कम निश्तित करण्यात आली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]