बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुद्ध धम्म हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला धर्म आणि दर्शन आहे. महात्मा बुद्ध शाक्यमुनि (गौतम बुद्ध) यांनी ह्या धरमाची स्थापना केली. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट ईंडीज) पसरला. बौद्ध धर्माचे पस्तीस कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे.बौद्ध धर्मग्रंथांना त्रिपिटक म्हणतात. त्रिपटकाची तीन पिटके आहेत.[अ]विनयपिटिक [आ] सुत्तपिटक [इ]अभिधम्मपिटक.बुद्ध चरित्र जातककथा मिलिंदपन्हा धम्मपद दीपवंस व महावंस थेरगाथा अपदान पेतवत्थु विमानवत्थु हे बौद्धधर्मातील इतर ग्रंथ आहेत.

मराठी पुस्तके[संपादन]

  • Gautama the Buddha : his Life and His Teaching (Vipashyana Research Institute)
  • धम्मपदं (नवसंहिता) : आचार्य विनोबा भावे
  • धर्म व धर्मपंथ (प्र.न. जोशी)
  • बुद्ध संप्रदाय आणि शिकवण (चिं.वि. जोशी]])
  • बौद्ध विचारधारा (संपादक- महेश देवकर, लता देवकर, प्रदीप गोखले : पुणे विद्यापीठ प्रकाशन)

बौद्ध धर्माची तत्वे[संपादन]

चित्रदालन[संपादन]