ज्ञान दिन (महाराष्ट्र)
Appearance
(ज्ञान दिवस (महाराष्ट्र) या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.[१][२][३][४][५]
गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.[६][७]
ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू
[संपादन]डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हणले जाते, त्याची काही कारणे खालिलप्रमाणे आहेत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.
- इ.स. २००४ मध्ये, कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली होती त्यात पहिलेनाव 'डॉ. भीमराव आंबेडकर' हे होते. विद्यापीठाने त्यांचा उल्लेख आधुनिक भारताचे जनक असा केला होता.
- इ.स. २०११ मध्ये, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते.
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- महाराष्ट्राचे विशेष दिवस
- आंबेडकर जयंती
- विद्यार्थी दिवस (महाराष्ट्र)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ desale, sunil. "Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as 'Gyan Diwas' | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार". India.com (इंग्रजी भाषेत). 2019-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा होणार". News18 Lokmat. 2018-08-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले.
- ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार". http://aajdinank.com/. 2018-08-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/
- ^ "Hindi News: ज्ञान दिवस के रुप में मनेगा बाबा साहेब का जन्मदिवस| नारनौल समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले.
- ^ "ज्ञान दिवस Archives - Marathi News paper Online Maharashtra latest articles". Marathi News paper Online Maharashtra latest articles (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
- ^ "आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार बाबासाहेबांची जयंती - Majha Paper | DailyHunt". DailyHunt (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.