नवबौद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतामधील इ.स. १९५६ च्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना हे संबोधन लागू होते.

बौद्ध धर्म[संपादन]

मुख्य लेख: बौद्ध धर्म

बौद्ध धर्म (पाली: बौद्धधम्म) भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि दर्शन आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक शाक्यमुनि (गौतम बुद्ध) होते. इ.स.पू. सहावे ते पाचवे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या मृत्युनंतर पुढील पाच शतकांत बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. बौद्ध धर्माचे १७५ कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुस-या क्रमांकाचा धर्म आहे.एका सर्वेक्षणानूसार चीन देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) बौद्ध आहे आणि ही लोकसंख्या भारत देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे किंवा जगभरातील हिंदू पेक्षा खूप जास्त आहे. चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, तैवान, द. कोरीया, श्रीलंका, कंबोडिया, लाओस, मंगोलिया, भूतान, हाँग काँग, मकाओ, तिबेट व सिंगापूर हे सर्व बौद्ध देश आहेत. तर ऑस्ट्रेलिया, नेपाळ, मलेशिया, ब्रुनेई इ. देशांत बौद्ध धर्म हा 'द्वितीय धर्म' आहे. भारतात 'अधिकृत' बौद्धांची संख्या १ कोटी आहे मात्र प्रत्यक्षात भारतातील बौद्धांची संख्या ही ६ कोटींहून (५%) अधिक आहे. भारतामध्ये सर्वाधिक बौद्ध धर्मीय महाराष्ट्र राज्यात आहेत व त्यांची संख्या १.४ कोटींच्या आसपास आहे.

उगम[संपादन]

भारतामधे बौद्ध धर्माचे साधारणपणे इ.स. ५०० पर्यंत समूळ उच्चाटन झाले.[१] भारतातील बौद्धधर्मीय काही कालांतराने इतर धर्म, पंथांमधे सामावले गेले. उर्वरीत बौद्धांना भारतीय समाजात अस्पृश्य म्हणून वागवले गेले[ संदर्भ हवा ]. हिंदू धर्माने अस्पृश्यांवरील लादलेल्या शिक्षणावरील बंदी आणि असमानतेची वागणुक मुळे कालांतराने त्यांचा इतिहास पुसला गेला.पण बोधिसत्व प.पु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शुद्र पुवीं क्षत्रिय होते हे उत्तर दिले नंतर क्षत्रिय हे बौध्द झाले. बौद्ध धर्म केवळ त्यांच्या संस्कृती, रुढी, परंपरा आणि प्रथांमधे शिल्लक राहिला.

धम्मचक्रप्रवर्तन दिन[संपादन]

इ.स. १९५६ मधे १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी नागपूर येथे ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली. हा धर्म अंगिकारून तथाकथित अस्पृश्य हे बौद्धधम्मात आले. भारतातील करोडो अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याला "धम्मचक्रप्रवर्तन दिन" म्हणून संबोधले जाते. या घटनेनंतर बौद्धधम्म पुनःस्वीकारलेल्या समाजाला नवबौद्ध किंवा नवयानी संबोधले जाते.

बावीस प्रतिज्ञा[संपादन]

धम्मदिक्षेबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर अनुयायांसमवेत बौद्धधम्माच्या बावीस प्रतिज्ञांचा स्वीकार केला.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

www.buddha22pledges.org