अमरावती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख अमरावती शहराविषयी आहे. अमरावती जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्याWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अमरावती
जिल्हा अमरावती
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०७२१
टपाल संकेतांक ४४४६०१
वाहन संकेतांक MH-२७
अमरावती शहर

अमरावती हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. विदर्भामध्ये प्रशासनाच्या दष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक टप्प्यांची अंबा व श्रीकृष्ण मंदिरे आहेत.

१९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "जकात खाजगी" म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे.

नाव[संपादन]

अमरावतीAmravati.ogg उच्चारण हे शहर अमरावती जिल्हा तसेच अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव [[इंद्र] याची नगरी / राजधानी असा होतो. या शहराला उमरावती असेही म्हटले जाते.

अमरावती याच नावाचे एक गाव आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यात आहे.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

अमरावतीचे हवामान हे उन्हाळ्यात गरम व कोरडे आहे. येथील हिवाळा थंड व कोरडा आहे. येथे उन्हाळा मार्च ते जून, पावसाळा जुलै पासून ऑक्टोबरपर्यंत , आणि त्यानंतर मार्चपर्यंत हिवाळा असतो. सर्वाधिक तापमान २५ मे १९५४ रोजी ४६.७° सेल्शियस असे होते आणि आणि सर्वात कमी तापमान ९ फेब्रुवारी इ.स. १८८७रोजी ५.०° सेल्शियस इतके होते.

पेठा[संपादन]

 1. राजापेठ
 2. अंबापेठ
 3. श्रीकृष्णपेठ

अमरावती जिल्ह्याला लागून असणारा परिसर व गावांची नावे १) लोणटेक २) मलकापूर ३) पांढरी ४) गौरखेडा ५) निंभा ६) भातकुली ७) सायत ८) जसापूर ९) आसरा १०) ऋणमोचन ११) शिंगणापूर १२) खोलापूर १३) बुधागड १४) धामोरी १५) म्हैसपूर १६) म्हैसांग १७) गणोजा १८) दाढी पेढी १९) कानफोडी २०) चाकूर २१) अडणगाव २२) अनकवाडी २३) परलाम ही सर्व गावे भातकुली तालुक्यात अमरावती जिल्ह्यात येतात. भातकुली येथील जैन मंदिरही प्रसिद्ध आहेत.

हवामान[संपादन]

शहर समुद्रसपाटीपासून उंचीवर वसलेले असल्यामुळे अमरावतीचे हवामान थंड आहे.[ संदर्भ हवा ] भरपूर प्रमाणात झाडे व शहराच्या परिसरात असणाऱ्या तलावांमुळे पाण्याची मुबलकता आहे. मेळघाटचिखलदरा परिसर येथून जवळच आहे. शहराजवळ १० किलोमीटरवर पोहरादेवी हे अभयारण्य आहे. शहराला लागूनच डोंगर असल्यामुळे डोंगर कुशीत बसल्यासारखे हे सुंदर शहर मनाला आकर्षित करते.

शिक्षण[संपादन]

अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पूर्वेस आहे. पर्वतपायथ्याशी असलेले हे विद्यापीठ अतिशय नयनरम्य वातावरणात आहे. विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध असलेला याचा परिसर खूप मोठा आहे. या विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. येथे संत गाडगेबाबा अध्यासन चालवले जाते.

शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोईमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे ठिकाण आहे यात काही नवल नाही.

शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय असून संपूर्ण भारतातून मुले येथे शिक्षणासाठी येतात.

शाळा[संपादन]

अमरावती सार्वजनिक शाळेव्यतिरिक्त खालीलप्रमाणे खाजगी शाळा आहेत.

 1. अस्मिता शिक्षण मंडळाचे अस्मिता विद्या मंदिर
 2. आदर्श प्राथमिक शाळा.
 3. भंवरिलाल सामरा इंग्रजी हायस्कूल
 4. दीप इंग्रजी प्राथमिक शाळा
 5. ज्ञानमाता हायस्कूल अमरावती
 6. म. गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,बडनेरा.
 7. DRS मुलांची शाळा
 8. मित्र उर्दू हायस्कूल
 9. मित्र इंग्रजी हायस्कूल
 10. गोल्डन मुले इंग्रजी हायस्कूल
 11. पवित्र क्रॉस कॉन्व्हेंट
 12. इंडो पब्लिक स्कूल
 13. लाटबाई शाळा
 14. मणिबाई गुजराती हायस्कूल
 15. मोहनलाल सामरा प्राथमिक शाळा
 16. नारायण दास हायस्कूल
 17. नवीन उच्च माध्यमिक शाळा
 18. ऑयस्टर इंग्लिश स्कूल, अमरावती.
 19. प्रगती विद्यालय
 20. राजेश्वरी विद्या मंदिर
 21. सरस्वती विद्यालय
 22. विद्वान प्रशाळा
 23. श्री राठी विद्यालय
 24. श्री शिवाजी M.P.H.S.School, अमरावती
 25. श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय
 26. श्री समर्थ हायस्कूल
 27. सेंट फ्रान्सिस हायस्कूल, अमरावती
 28. सेंट थॉमस इंग्रजी हायस्कूल, अमरावती
 29. वनिता समाज
 30. म. गांधी इंग्लिश स्कूल, बडनेरा

जैवविविधता[संपादन]

अर्थकारण[संपादन]

बाजारपेठ[संपादन]

 1. जोशी मार्केट
 2. इतवारा बाजार
 3. अंबादेवी रोड
 4. तख्तमल इस्टेट
 5. जवाहर रोड
 6. शाम चौक
 7. जयस्तंभ चौक
 8. गांधी चौक
 9. खंडेलवाल मार्केट
 10. सराफा बाजार
 11. कॉटन मार्केट

प्रशासन[संपादन]

नागरी प्रशासन[संपादन]

जिल्हा प्रशासन[संपादन]

वाहतूक व्यवस्था[संपादन]

== रेल्वे वाहतूक == अमरावती शहरात अमरावती, बडनेरा आणि नविन अमरावती ही तीन मुख्य रेल्वे स्थानक आहेत. अमरावती स्थानक हे शहरात वसलेले आहे. बडनेरा हे स्थानक मुंबई - कलकत्ता लोहमार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. तसेच नवीन अमरावती स्थानक हे अमरावती - नरखेड लोहमार्गावर वसले आहे.

अमरावती येथून सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्या[संपादन]

क्रमांक रेल्वे नाव गंतव्यस्थान कधी सुटण्याची वेळ
५११३६ पॅसेंजर बडनेरा रोज ०२:१५
५११३८ पॅसेंजर बडनेरा रोज ०३:५५
१२११९ इंटरसिटी एक्सप्रेस अजनी सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र ०५:३०
१२७६६ सुपरफास्ट एक्सप्रेस तिरुपति सोम, गुरु ०६:५५
५११४० पॅसेंजर बडनेरा रोज ०७:१५
५९०२६ फास्ट पॅसेंजर सुरत सोम, शुक्र, शनि ०९:००
५११४२ पॅसेंजर बडनेरा रोज ११:४५
५१२६१ पॅसेंजर वर्धा रोज १५:१०
१२१५९ सुपरफास्ट एक्सप्रेस जबलपूर रोज १७:४५
११४०६ एक्सप्रेस पुणे सोम, शनि १८:३०
५११४६ पॅसेंजर बडनेरा रोज १८:५०
१२११२ अंबा सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबई रोज १९:०५
५११४८ पॅसेंजर बडनेरा रोज २०:२५
५११५० पॅसेंजर बडनेरा रोज २३:४०

लोकजीवन[संपादन]

विस्तार[संपादन]

अमरावती शहराची रचना फार छान आहे. विस्तृत रस्ते आणि शहराचा विस्तीर्ण विस्तार शहराला भव्यता देतात. मुख्य चौक म्हणजे राजकमल चौक, आयर्विन चौक, श्याम चौक, राजापेठ चौक, पंचवटी चौक, अंबापेठ चौक, आणि ज्या अंतिम बस स्थानकाला येथे डेपो असे म्हणतात तो डेपो चौक.

हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे - अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. जुने गाव हे तटबंदीच्या आत वसलेले असायचे. आज शहराचा विस्तार फार झाला आहे. आता महापालिकेच्या सरहद्दी बाजूच्या उपनगरांच्याही बाहेर गेल्या आहेत. वलगाव, बडनेरा आता अमरावती शहरात मोडतात. शहराचे मुख्य भाग म्हणजे अंबा पेठ, गाडगे नगर, साईनगर, श्रीकृष्ण पेठ, दस्तुर नगर, राजापेठ, सातुर्णा, कंवर नगर, रुक्मिणी नगर, यशोदा नगर, इत्यादी.

सांस्कृतिक[संपादन]

अंबादेवी हे शहराचे मुख्य दैवत आहे. शहराच्या मध्यावर अंबापेठेत देवीचे पुरातन देऊळ आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला याच मंदिरात बोलावले होते, असे म्हटले जाते. येथे श्रीकृष्णाने देवीची पूजा करून रुक्मिणीला सोबत नेले होते. मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या खाली योगाचार्य जनार्दन स्वामी यांची समाधी आहे.

श्री शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेला तपोवन हा कुष्ठरोग्यांसाठीचा प्रकल्प शहराच्या पूर्वेला विद्यापीठाच्या इमार्तीसमोर आहे.

शिक्षण[संपादन]

प्राथमिक व विशेष शिक्षण[संपादन]

महत्त्वाची महाविद्यालये[संपादन]

 1. केशरबाई लाहोटी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय
 2. कृषि महाविद्यालय
 3. तक्षशिला कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
 4. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय
 5. बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालय
 6. बियाणी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
 7. विदर्भ ज्ञान विज्ञान संथेचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
 8. विद्याभारती कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
 9. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
 10. शासकीय तंत्रनिकेतन
 11. श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
 12. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय
 13. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चे शारीरिक शिक्षण महाविद्यालय

संशोधन संस्था[संपादन]

खेळ[संपादन]

 1. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चे शारीरिक शिक्षण महाविद्यालय

पर्यटन स्थळे[संपादन]

 1. चिखलदरा
 2. मेळघाट
 3. सेमाडोह
 4. अंबादेवी मंदिर
 5. एकवीरादेवीचे मंदिर
 6. अष्टमासिद्धी
 7. अप्पर वर्धा धरण (नल-दमयंती सागर)
 8. कोंडेश्व्वार् मंदिर्