Jump to content

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर या पानावरून पुनर्निर्देशित)
एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर
उपशीर्षक एक महानायक
दूरचित्रवाहिनी अँड टीव्ही
भाषा हिंदी
प्रकार ऐतिहासिक
देश भारत
निर्माता स्मृती शिंदे
दिग्दर्शक इम्तियाज पंजाबी
निर्मिती संस्था सोबो फिल्म्स
लेखक शांती भूषण
कलाकार खाली पहा
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीत साहिब मेरे भीमराव (मराठी: "साहेब माझे भीमराव")
प्रसारण माहिती
पहिला भाग १७ डिसेंबर २०१९
अंतिम भाग चालू

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर ही अँड टीव्ही दूरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक ऐतिहासिक हिंदी मालिका आहे. ही मालिका भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित आहे.[] ही मालिका इम्तियाज पंजाबी द्वारे दिग्दर्शित, स्मृती शिंदे यांच्या सोबो फिल्म्स द्वारे निर्मित असून शांती भूषण यांनी तीचे लेखन केले आहे.[][] ७ नोव्हेंबर २०१९ रोजी या मालिकेचे टिझर प्रसिद्ध झाले होते, आंबेडकरांची सुरू करण्याची घोषणा अँड टीव्हीने केली होती. १७ डिसेंबर २०१९ पासून या मालिका एंटरटेनमेंटचे सहायक असलेल्या हिंदी टीव्ही चॅनेल अँड टीव्ही वर प्रदर्शित होत आहे.[][]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार आयुध भानुशाली याने साकारली आहे, तर अभिनेता अथर्व कर्वे यांनी त्यांच्या तरुणपणीची भूमिका साकारत आहे. मालिकेची कथा पुढे गेल्यानंतर अभिनेते प्रसाद जवादे हे मुख्य भूमिका साकारतील.[][] ही मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी कथा आहे, या मालिकेत त्यांचा वयाच्या पाचव्या वर्षापासून ते भारतीय राज्यघटनेचे लेखक होण्यापर्यंतचा प्रवास दर्शवला जाणार आहे. ही मालिका प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता, २२ मिनिटांच्या भागांसह प्रसारित होत असते.[] बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर निघालेली ही तिसरी मालिका आहे; यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथाडॉ. आंबेडकर ह्या मालिका बनवण्यात आल्या आहेत.

कलाकार

[संपादन]

अनुवादित

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड महानायका डॉ. बी.आर. आंबेडकर झी कन्नडा ४ जुलै २०२० - चालू
तेलुगू माना आंबेडकर झी तेलुगू २१ सप्टेंबर २०२० - ११ मार्च २०२३
तमिळ पुरातचियलार डॉ. आंबेडकर झी तमिळ २४ सप्टेंबर २०२० - ९ मे २०२१
मराठी जय भीम: एका महानायकाची गाथा झी चित्रमंदिर १४ एप्रिल २०२३ - चालू
झी मराठी २५ सप्टेंबर २०२३ - चालू

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संविधान के निर्माता बीआर आंबेडकर की कहानी पर्दे पर, जल्‍द शुरू होने वाला है नया धारावाहिक 'एक महानायक'". 2019-11-16 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-12-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Ambedkars life to be brought alive in TV series". www.outlookindia.com. 2019-12-13 रोजी पाहिले.
  3. ^ a b "A new TV show on B.R. Ambedkar raises questions of responsible representation". December 6, 2019. December 6, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 7, 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Meet the star cast of &TV's 'Ek Mahanayak Dr B R Ambedkar'". www.Tellychakkar.com.
  5. ^ "Ambedkars life to be brought alive in TV series". www.outlookindia.com.
  6. ^ "Ek Mahanayak Dr B R Ambedkar Starting date, Cast, and broadcasting". November 9, 2019. 2020-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-07 रोजी पाहिले.
  7. ^ "'Ek Mahanayak - Dr. B.R. Ambedkar' actor Neha Joshi says, 'I've always been experimental at heart' - Times of India". The Times of India.
  8. ^ "अभिनेता प्रसाद जावडे करतोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूमिकेसाठी जय्यत तयारी". लोकमत.
  9. ^ "Atharva Karve roped in to play grown-up Ambedkar in Ek Mahanayak Dr. B.R. Ambedkar : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2021-06-22. 2021-06-23 रोजी पाहिले.
  10. ^ "अभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत". महाराष्ट्र टाइम्स. 6 डिसेंबर 2019. 2019-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-07 रोजी पाहिले.
  11. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील 'दामू' हिंगोलीचा". सकाळ.