गदर पार्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गदर पार्टीचा झेंडा

गदर पार्टी(स्थापना २५ जून १९१३) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही एक क्रांतिकारी संस्था होती, अमेरिका आणि कॅनडा मध्ये जे भारतीय रहिवासी राहत होते, त्यांनी मिळून ही क्रांतिकारी संस्था स्थापन केली होती. ज्यामध्ये हिंदू, शीख आणि मुस्लिम नेते होते. पक्षाचे मुख्य कार्यालय सॅन फ्रान्सिस्को(अमेरिका) येथे होते. त्या संघटने मध्ये पुढील सदस्य होते, परमानंद भाई, सोहनसिंह भक्ना, हर दयाल, मोहम्मद इक्बाल शेदाई, करतार सिंग साराभा, अब्दुल हाफिज मोहम्मद बरकातुल्ला, सुलेमान चौधरी, आमिर चौधरी, रासबिहारी बोस आणि गुलाब कौर यांचा समावेश होता.[१]

गदर पार्टी

अर्थ[संपादन]

गदर म्हणजे बंड होय ज्याचा मुख्य उद्देश भारत मध्ये क्रांती आणणे हा होता. ज्यासाठी इंग्रजांना हद्दपार करून भारत मुक्त करणे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गदर पार्टीचे मुख्यालय स्थापन करण्यात आले. ज्याचे प्रमुख कार्य म्हणजे तरुण भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना पसरवणे आणि त्यांना बंड करण्यास प्रवृत्त करणे हा हेतु होता.[२]

स्थापना[संपादन]

गदर पार्टीची स्थापना २५ जून १९१३ रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या अस्टोरिया या शहरामध्ये झाली. गदर पार्टीचे अध्यक्ष सोहनसिंह भकना हे होते, तर केसर सिंह थथगढ - उपाध्यक्ष, लाला हरदयाल - महामंत्री, लाला ठाकुर दास धुरी - संयुक्त सचिव आणि पंडित काशी राम मदरोली - कोशाध्यक्ष होते. लाला हरदाळ हे त्याचे सरचिटणीस होते. 'गदर' या पत्राच्या आधारे पक्षाचे नाव 'गदर पार्टी' असे ठेवण्यात आले होते. 'गदर' या पत्राने भारतावर ब्रिटीशांच्या होणाऱ्या जुलुमांवर जगाचे लक्ष वेधून घेतले. ह्या संघटनेच्या शाखा कॅनडा, चीन, जपान इत्यादी मध्ये उघडण्यात आल्या. डिसेंबर १९१३ कॅलिफोर्नियातील सॅक्रामॅटो येथे गदर पार्टीची पहिली सभा झाली.[३]

हेतु[संपादन]

गदर पार्टीचा उद्देश भारत मध्ये क्रांती आणणे हा होता. ज्यासाठी इंग्रजांना हद्दपार करून भारत मुक्त करणे. ज्याचे प्रमुख कार्य म्हणजे तरुण भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना पसरवणे आणि त्यांना बंड करण्यास प्रवृत्त करणे हा हेतु होता.[४]

गदर साप्ताहिक पत्र[संपादन]

१ नोव्हेंबर १९१३ पासून या संस्थेने 'गदर' या साप्ताहिक पत्राचे प्रकाशन सुरू केले. हे पत्र सॅन फ्रान्सिस्कोच्या हिमालयन या आश्रमातून प्रकाशित करण्यात आले. ते प्रथम उर्दू या भाषेमध्ये प्रकाशित झाले, नंतर ते इतर भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. . "युगांतचार आश्रम" हे गदर पार्टीचे मुख्यालय होते.[५]

सदस्य[संपादन]

 • सोहनसिंग भक्ना
 • करार सिंह सराभा
 • पांडुरंग सदाशिव खानखोजे
 • गडा सिंग
 • बाबा उज्जरसिंह
 • तेजा सिंग सुक्रिक्ट
 • ग्रीन शेर ओएसमन
 • हरनाम सिंग टुंडालाट
 • बाबा वसाकांचा दिडेहर
 • हरनाम सिंग कैरो सहरा
 • लाला हर दयाल
 • बाबा भगवान सिंग दुसनं
 • मौलवी बरकततुल्ला
 • तारकनाथ दास
 • बाबा दुल्ला सिंग जलालवाला
 • हरनाम सिंग ब्लॅक सांगियान
 • बाबा गुरमुख सिंग लाथॉन
 • सोहन लाल पाठक
 • भगतसिंग बिलगा
 • बाबा ठकार सिंह
 • हरनाम सिंग सैनी
 • विष्णू गणेश पिंगळे
 • भाऊ रणधीर सिंग
 • बाबा हजारा सिंग
 • हरीकशन तळवड
 • बाबा चौधरीदान लिलाव
 • बाबा ज्वाला सिंग
 • मा उधमसिंह कासळ
 • बाबा लाल सिंग साहिबण
 • जमालसिंग ढाका
 • मुंशा सिंह नाखूष
 • करीम बख्ष

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "ग़दर पार्टी - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org (हिंदी भाषेत). 2018-08-17 रोजी पाहिले.
 2. ^ "Foundation of Ghadar Party 1913 - General Knowledge Today". www.gktoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-08-17 रोजी पाहिले.
 3. ^ "Gadar Party : facts, history, information". www.factsninfo.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-08-16. 2018-08-17 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
 4. ^ "ग़दर पार्टी की स्थापना कैसे हुई और इसके क्या उद्देश्य थे ? - Vedic Press". Vedic Press (इंग्रजी भाषेत). 2018-01-30. 2018-08-17 रोजी पाहिले.
 5. ^ "गदर पार्टी के बारे में जानें - Gadar Party 1913 in Hindi - Sansar Lochan". Sansar Lochan (इंग्रजी भाषेत). 2018-07-23. Archived from the original on 2020-10-27. 2018-08-17 रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)