मिठाचा सत्याग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गांधीजी दांडी यात्रेत
गांधीजी व सरोजिनी नायडु दांडी यात्रेदरम्यान

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा, भारताच्या ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. याची सुरूवात दांडी यात्रेने झाली. हा सत्याग्रह असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमापासून १२ मार्च, इ.स. १९३० ला झाली. ही यात्रा २४ दिवस आणि ३९० कि.मी. चालली व दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल, इ.स. १९३० ला पोहचली.

बाह्य दुवे[संपादन]