महाराष्ट्रामधील बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाराष्ट्रातील बौद्ध
Dikshabhumi.jpg
दीक्षाभूमीचा स्तूप, नागपूर
एकूण लोकसंख्या

१,२५,३१,२०० (प्रमाणः- १०.८१%) (२०११)[१]

लोकसंख्येचे प्रदेश
विदर्भ  • मराठवाडा  • खानदेश  • कोकण  • मुंबई उपनगर
भाषा
मराठीवऱ्हाडी
धर्म
नवयान बौद्ध धर्म
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी लोक


महाराष्ट्रामधील बौद्ध धर्म हा राज्याचा एक प्रमुख धर्म आहे. महाराष्ट्र हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले राज्य आहे. बौद्ध धर्म हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला. नाग लोकांनी धर्मप्रचारास प्राणांची बाजी लावून दिली होती. हजारो बुद्ध लेणी कोरल्या गेल्या. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता.

२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.[२] महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा हिंदूइस्लाम नंतर तृतीय क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण सुमारे ६% आहे. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी (नवबौद्ध) सुमारे ९०% महाराष्ट्रात आहेत.[३] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशभरातील आपल्या लाखो अनुयायांसह १९५६ च्या विजयादशमीच्या दिवशी बुद्धधर्मात प्रवेश केला. हा दीक्षा समारंभ नागपूर येथे झाला. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडाकोकण येथील दलित समाजाने यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला. यामुळेच महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळते. बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली असलेला राज्यातील महार समाज आणि महाराष्ट्रीय बौद्ध समाज ह्या दोन्ही बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १ कोटींवर (१०-१२%) आहे.

इतिहास[संपादन]

महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला असून यात नाग लोकांचे मोठे योगदान होते. पुरातन वास्तू व प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते भारतातील बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे (लेणी) महाराष्ट्रात सापडतात, ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते. अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तु-शिल्पे त्याकाळी महाराष्ट्र बौद्ध धर्माचे अधिपत्य दर्शविते. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर अनुसरला जात होता.

लोकसंख्या[संपादन]

इ.स. १९५१ मध्ये महाराष्ट्रात अवघे २,४८९ बौद्ध (०.०१%) होते, डॉ. आंबेडकरांच्या सामूदायिक धर्मांतरानंतर इ.स. १९६१ मध्ये ही संख्या १,१५,९९१% वाढून २७,८९,५०१ झाली होती.

जनगणना १९५१ ते २०११ दरम्यानची महाराष्ट्रीय बौद्धांची लोकसंख्या[४]
वर्ष बौद्ध लोकसंख्या (लाखात) राज्यातील प्रमाण (%) वाढ (वृद्धी) (%)
१९५१ ०.०२५ ०.०१
१९६१ २७.९० ७.०५ ११५९९०.८
१९७१ ३२.६४ ६.४८ १६.९९
१९८१ ३९.४६ ६.२९ २०.८९
१९९१ ५०.४१ ६.३९ २७.७५
२००१ ५८.३९ ६.०३ १५.८३
२०११ ६५.३१ ५.८१ ११.८५
भारतातील बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%)

२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील ८४,४२,९७२ बौद्धांपैकी ६५,३१,२०० (७७.३६%) बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय समुदाय हा भारतातील सर्वात मोठा नवबौद्ध (नवयानी बौद्ध) समुदाय आहे. बौद्धांचे सर्वात जास्त प्रमाण विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आहे. या ११ जिल्ह्यांत एकूण ६५ लाख बौद्धांपैकी सुमारे ३० लाख बौद्ध आहेत. यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये त्यांची लोकसंख्या १२ ते १५ % आहे. तर अकोलामध्ये बौद्धांचे १८% एवढे उच्च प्रमाण आहे. गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये अनुसूचित जमातींची संख्या जास्त असून बौद्धांची संख्या ७ ते १०% आहे. आणखी १२ लाख बौद्ध हे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात आहेत. यातील आधीच्या तीन जिल्ह्यामध्ये त्यांचा हिस्सा १०% पेक्षा जास्त आहे, तर हिंगोलीमधील एकूण लोकसंख्येत १५% बौद्ध आहेत. ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई, रायगढ, पुणे, सातारा आणि रत्नागिरी या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात आणखी १८ लाख बौद्ध आहेत, यातील मुंबई उपनगर जिल्हा आणि रत्नागिरी वगळता इतर जिल्ह्यांच्या लोकसंख्येत बौद्धांचा हिस्सा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मुंबई उपनगर आणि रत्नागिरी मधील लोकसंख्येत अनुक्रमे ५% आणि ७% बौद्ध आहेत.

अनुसूचित जातीचे बौद्ध[संपादन]

अनुसूचित जातीमध्ये बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. इ.स. २००१ मध्ये देशात ४१.५९ लाख बौद्ध हे अनुसूचित जातीचे होते, तर इ.स. २०११ मध्ये हे प्रमाण ३८% वेगाने वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी ५२.०४ लाख (९०% पेक्षा अधिक) महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ५२,०४,२८४ (७९.६८%) अनुसूचित जातीचे बौद्ध आहेत.[५] तर महाराष्ट्रातील एकूण १,३२,७५,८९८ अनुसूचित जातीत बौद्धांचे प्रमाण ३९.२०% आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचा बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.[६]

धर्मांतरे[संपादन]

१९५६ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामूदायिक धर्मांतरे झालेली आहेत आणि आजही होत आहेत. त्यातील काही धर्मांतरे –

१९५० चे दशक[संपादन]

 • १४ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

 • १५ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

 • ७ डिसेंबर, १९५६ (मुंबई, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला.


१९६० चे दशक[संपादन]

१९७० चे दशक[संपादन]

१९८० चे दशक[संपादन]

१९९० चे दशक[संपादन]

२००० चे दशक[संपादन]

२००१ चे दशक[संपादन]

२०११ चे दशक[संपादन]

 • मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्हातील १८० कुटुंबांनी (सुमारे ८५० व्यक्तींनी) बौद्ध धर्मात धर्मांतर केले.[७]
 • २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला.

बौद्ध आंदोलने[संपादन]

तीर्थस्थळे[संपादन]

बौद्ध विहारे[संपादन]

बौद्ध लेणी[संपादन]

सर्व महाराष्ट्रातील बौद्ध लेणी या बौद्ध तीर्थस्थळे व प्रार्थमास्थळे आहेत. भारतात अनेक बौद्ध लेणी किंवा बुद्ध लेणींची निर्मीती झालेली आहेत त्यातील बहुतांश बुद्ध लेणी या महाराष्ट्र राज्यात निर्मिलेल्या आहेत.

स्मारके[संपादन]

उल्लेखनिय व्यक्ती[संपादन]

मुख्य: :वर्ग:भारतीय बौद्ध

महाराष्ट्रातील काही उल्लेखनिय बौद्ध व्यक्ती (मराठी बौद्ध व्यक्ती) —

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "डी.एन.ए. इंडिया" (इंग्रजी मजकूर). 
 2. ^ मनु मोदगिल. "दी क्वींट" (इंग्रजी मजकूर). 
 3. ^ मनु मोदगिल. "इंडिया स्पेंड" (हिंदी मजकूर). 
 4. ^ http://blog.cpsindia.org/2016/01/religion-data-of-census-2011-xi_19.html?m=1
 5. ^ "बौद्ध बढ़े, चुनावी चर्चे में चढ़े". https://m.aajtak.in (hi मजकूर). 2018-05-11 रोजी पाहिले. 
 6. ^ "Buddhism is the fastest growing religion among Scheduled Castes" (इंग्रजी मजकूर). 
 7. ^ "Dalits still converting to Buddhism, but at a dwindling rate" (इंग्रजी मजकूर). 


बाह्य दुवे[संपादन]