सोलापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कवी कुंजविहारी

हा लेख सोलापूर शहराविषयी आहे. सोलापूर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?सोलापूर
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
सातरस्ता , सोलापूर
सातरस्ता , सोलापूर
गुणक: 17°41′N 75°55′E / 17.68°N 75.92°E / 17.68; 75.92
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१४,८८६ चौ. किमी
• ४५७ मी
जिल्हा सोलापूर
लोकसंख्या
घनता
४३,१७,७५६ (2011)
• २९०/किमी
महापौर सौ.शोभा बनशेट्टी

http://www.solapurcorporation.gov.in/

कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३००१
• +०२१७
• एमएच-१३
संकेतस्थळ: सोलापूर महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 17°41′N 75°55′E / 17.68°N 75.92°E / 17.68; 75.92

सोलापूरSolapur.ogg उच्चार शहर हे दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. ते सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते.सोलापूर या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणून सुद्धा ओळखले जात असे. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर 'सोलापूरी चादरं' प्रसिद्ध आहेत.

सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी श्री.शिवयोगी सिद्धेश्वर यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली. आणि ते वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले.सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. सोलापूर हे भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेनकिसन सारडा यांना जानेवारी १२, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.

पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर , मल्लिकार्जुन मंदिर , हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत) , शुभराय आर्ट गॅलरी ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात.सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " हि मोठी यात्रा असते . भारत सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूरचे हि नाव या यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूर हि स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसतो आहे.

इतिहास[संपादन]

सोलापूरला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. इ.स.पू. २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवेब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग! मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ हा कायदा सोलापूरला लागू होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दूल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी १९३१ रोजी या लढ्यातील चार वीर फाशी गेले. आजही तो दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात. तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा; सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्र्चितच आहे.सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते.सोलापूर शहराचा स्वतंत्र लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते.हुतात्मा शिंदे ज्या वास्तू मध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे.तेथे आज कोणी वास्तव्यास नाही.त्यांना मुल नव्हती.त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या.

१९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारा साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूरात आले होते.तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते

नाव[संपादन]

"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा)' आणि 'पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.[ संदर्भ हवा ]

भूगोल[संपादन]

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे.सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगलीविजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारापुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

सोलापूर उच्चार (सहाय्य·माहिती) शहर हे दक्षिणी महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर 'सोलापूर चादरी' प्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.सोलापूर हा जिल्हा धान्याचे कोठार आहे.

सोलापूरचे भौगोलिक समन्वय अक्षांश: 17 ° 40'17 "उ रेखांश: 75 ° 54'37 "पू समुद्रसपाटीपासूनची उंची: 473 मीटर = 1551 फूट दशांशमध्ये सोलापूरचे समन्वय अक्षांश: 17.671 5200 ° रेखांश: 75.9104400 ° सोलापूरचे डिग्री आणि दशांश मिनिटाचे समन्वय अक्षांश: 17 ° 40.2 912 'उ रेखांश: 75 ° 54.6264 'पू

मुख्य उपनगरे -

 • माढा
 • पंढरपूर

शहराच्या दक्षिणेकडील सोलापूर-विजापूर महामार्गावरील भागास जुळे सोलापूर म्हणतात.

मंगळवेढा बार्शी करमाळा अक्कलकोट सांगोला माळशिरस मोहोळ द.सोलापूर उ.सोलापूर

हवामान[संपादन]

Solapur साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 30.9
(87.6)
34.0
(93.2)
37.4
(99.3)
39.7
(103.5)
40.1
(104.2)
35.0
(95)
31.7
(89.1)
31.0
(87.8)
31.8
(89.2)
32.5
(90.5)
31.0
(87.8)
30.0
(86)
33.76
(92.77)
सरासरी किमान °से (°फॅ) 16.0
(60.8)
18.0
(64.4)
21.6
(70.9)
24.8
(76.6)
25.3
(77.5)
23.4
(74.1)
22.4
(72.3)
21.9
(71.4)
21.6
(70.9)
20.9
(69.6)
17.9
(64.2)
14.9
(58.8)
20.73
(69.29)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 2.2
(0.087)
4.6
(0.181)
3.8
(0.15)
11.2
(0.441)
36.9
(1.453)
111.5
(4.39)
138.8
(5.465)
137.3
(5.406)
179.8
(7.079)
97.4
(3.835)
23.2
(0.913)
4.8
(0.189)
751.5
(29.589)
स्रोत: IMD


जैवविविधता[संपादन]

भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना 'सोलापूर डाळिंब' असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा वाव निर्माण झाला आहे.

अर्थकारण[संपादन]

बाजारपेठ[संपादन]

सोलापूर शहर हे बाजारपेठेच्या दृष्टीने फार महत्व आहे. कारण सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर आहे की प्रत्येक स्त्रीयांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येईल.इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वी पासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरु असलेला पावर लुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला हि ओळख प्राप्त झाली. सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो.बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे.

सोलापूरात सोलापूरी चादर हि तितकीच प्रसिद्ध आहे.

प्रशासन[संपादन]

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर, माढा माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.

विधानसभा मतदारसंघ (११) : मोहोळ, उत्तर सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, अक्कलकोट, पंढरपूर , करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस, बार्शी.


नागरी प्रशासन[संपादन]

जिल्हा सप्रशासन[संपादन]

सोलापूर वाहतूक व्यवस्था[संपादन]

सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा जटील आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच असलेली दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येते.सोलापूर शहरातून ४ प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते.

लोकजीवन[संपादन]

सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरु आहे.कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्यावतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो.म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

संस्कृती[संपादन]

संगीत महोत्सव[संपादन]

रंगभूमी[संपादन]

सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्य गृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्य गृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे.याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.याचे व्यवस्थापन सोलापूर जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत.सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे.

चित्रपट[संपादन]

सोलापूर हे कर्नाटकआंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. 'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार हि मिळालेला आहे.

धर्म-अध्यात्म-भाषा[संपादन]

सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश च्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्माचे व भाषेचे लोक आढळून येतात.

 • मुख्य भाषा : मराठी ,कन्नड ,तेलुगू ,उर्दू .
 • इतर भाषा : हिंदी ,गुजराती ,सिंधी ,पंजाबी ,पारशी .तामिळ ,मल्याळम
 • Nandidwaj yatra photo
  बोली भाषा : कैकाडी ,पारधी ,गोरमाटी( बंजारा किंवा लमाण ) ,राजस्थानी ,मारवाडी ,वडारी .


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंधीध्व्ज उभारले जातात.चार दिवस चालणार्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आद्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढरे वस्र्त परीधन केलेले असतात,यास बाराबंदी असे म्हटले जाते.१२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तेलाभिशेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लीगाना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा सपन्न केला जातो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मालीकार्जुन मंदिरात निदीध्वजाच्या वस्त्रावीसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.

सिध्दरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते.एके दिवशी कुंभार कन्येने सिध्दरामेश्वर यांना तिचा मानस सांगीतला कि ती सिध्दरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते,सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले कि मी ब्रम्हचारी आहे , माझे विवाह महादेवाशी झाले आहे.तरीही ती कुंभार कन्या ऐकली नाही ,त्यावर सिद्धरामेश्वर तिला बोले की तू या माझ्या योगदांडा सोबत विवाह कर पण तुला विवाहाच्या दुसऱ्या दिवशी तुझा देह त्याग करावा लागेल.१३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्याने तिचा देह त्याग केला.

 सोलापुर शहरातील विजापूर रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पाश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे.

मंदिराची रचना:

        मंदिर प्रशस्त जागेत असून प्राकार मोठे आहेत.याच्या चोहोबाजूस तटबंदी आहे.चारही बाजूस एक एक परवेशद्वार आहे.प्राकारच्या,आत मध्यभागी मंदिर आहे. मंदिराची बांधणी दुमजली सहश्य आहे. 
गर्भगृह: 
    तळघरातील साधारण चौरस आकार गर्भगृह आहे.या गर्भगृहाला दोन प्रवेशद्वार आहेत.एका दारातून वरील मंडपसदृश्य जागेतून खाली येणाऱ्या गर्भगृहाकडे पायऱ्या आहेत. हे द्वार दक्षिणेकडे आहे. दुसरे द्वार गर्भगृहातून सरळ बाहेर जाते.

सभामंडप :

    इतर नगरशैली, द्राविडी शैलीतील मंदिराप्रमाणे या मंदिरास गर्भगृहाकडे मंडप अशी रचना आहे. मंडपात दोन देवकोष्टक आहेत .एकामध्ये नंदी आहे.

शिखर:

मंडपावर एक चौरस छत आहे. जे मंडपाच्या लांबीरुंदीपेक्षा मोठेआहे.या छताला बाहेरून सजावट केली आहे.शिखरावर विविध मूर्ती बसवण्यात आले आहे. त्याच्या एकावर एक असे चार मजले आहेत.प्रत्येक मजल्यावर देवकोष्टक असून या मूर्ती आहेत. विमानावर ४थ्या मजल्यावर नंतर कमळाच्या पाकळ्याप्रमाणे रचना आढळते. साधारणतः आमलकासरखे दिसते, त्यावर पितळी शिखर आहे.

बाह्यबाजू:

    प्रकाराच्या आत भिंतीला लागून आतील बाजूने चोहोकडील बाजूस ३मी.रुंद.व१.५मी उंचीचे सलग कट्टा आहे.या कट्ट्याच्या रुंदीएवढे छत आहे,यामध्ये कमानी आहेत . पूर्वेस, पश्चिमेस व उत्तरेस ६ तर दक्षिणेस ७ कमानी आहेत. प्रकाराच्या आतील हनुमान ,गणेश,नागदेवता,मूर्ती आहेत.प्राकाराच्या बाहेरून,भिंती(तटबंदीच्या) बाहय बाजूस रुंद अशा स्वरूपाचे चौथऱ्या प्रमाणे सपाट अशी रचना आहे.

दक्षिणकालिका मंदिर[संपादन]

महाराष्ट्रातील सोलापूर स्थित श्री दक्षिणाकालिका देवी ही निलगार समाजाची कुलदेवता आहे. भव्य अशा या मंदिरात श्री गणपती देवता, श्री ज्ञान सरस्वती देवी, श्री लक्ष्मी-विष्णू देवता समवेत श्री दक्षिणा कालिका देवीचे मुख्य मंदिर आहे. मंदिरातील गाभाऱ्याचे बांधकाम दगडी पल्लवशैलीतील आहे. या मंदिरातील सर्व देवदेवतांची प्राणप्रतिष्ठापना ८ एप्रिल २००२ यादिवशी श्रीविद्याअखंडमहायोगाचार्य श्री श्रीनिवास शामराव काटकर व गुरुमाता सौभाग्यवती सुलक्षणादेवी श्रीनिवास काटकर यांच्या हस्ते झाले. जगातील असे एकमेव मंदिर आहे कि, मंदिराच्या शिखरावर दशमहाविद्येच्या मुर्त्या पहावयास मिळतील श्री दक्षिणा कालिका देवीची मूर्ती ही सात फुटी असून काळ्या पाषाणाची, चतुर्भुज, गळ्यात मुंडमाळा, कमरेला हातांची मेखला आहे. उजवा हात अभय व वर मुद्रा तसेच डाव्या हातात खड्ग आणि मुंड धारण केलेली आहे. देवीच्या गर्भालयाच्या बाहेरील बाजूस क्रमशः ब्राह्मी, वैष्णवी आणि माहेश्वरी या पाषाणाच्या मुर्त्या आहेत. या मंदिरात नित्य त्रिकाल नैवेद्य, पूजा, आरती, होमहवन तसेच वर्षातून चार नवरात्रोत्सव साजरा केला जातो. विशेषतः दर शुक्रवारी राहुकाल अर्चन केली जाते. दक्षिणा काली याचा अर्थ सर्व भक्तांना फल स्वरुपात वर देणारी असा असल्याने देवी भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनास येतात. श्रीविद्याअखंडमहायोगाचार्य श्री श्रीनिवास शामराव काटकर यांच्या अनुज्ञेने प्रधानार्चक श्री व्यंकटेश रामचंद्र कुलकर्णी हे नित्य पूजा करतात.

कुंभाराचा मान :[संपादन]

सिद्धरामेश्वर आणि कुंभारकन्येच्या विवाह सोह्ल्यानिमित्त सकाळी मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांच्या कुंभार वाड्यामध्ये गणपती व सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून दिवे घातले जातात. कुंभार समाजाच्यावतीने चालत आलेल्या परंपरेने मातीच्या ५६ घागरी हिरेहब्बुकडे सुपूर्त केले जाते.१२ जानेवारीला तेलाभिषेकासाठी तेलाच्या घागरीचे पूजन मानकरी कुंभार यांच्या हस्ते होऊन ती मानकरी योगिनाथ शिवशेट्टी यांच्याकडे दिली जातात.१३ जानेवारी रोजी कुंभार यांच्या निवास स्थानी पंच्यामृत घागरीचे पूजन आणि मनाच्या पहिल्या नंदिध्वजास खोबरे-लीबाचे हार आणि बाशीग बांधून पूजा केली जाते.१४ जानेवारी रोजी होम कट्ट्यावरील लिंगाची विधिवत पूजा मानकरी कुंभार यांच्या कडून करण्यात येते.

राष्ट्रीय एकात्मता , सामाजिक समता :[संपादन]

नंदिध्वज हे सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाचे प्रतिक असून यात्रेतील मिरवणुकीमध्ये मानाचे सातही नंदिध्वज सिध्देश्वर देवस्थनच्या मालकीचे असून पहिला नंदिध्वज {अगोदर वडार समाज कडे होत} आता हिरेहब्बू यांचा कडे मानकरी मान आहे.दुसरा कसब्यातील देशमुख,तिसरा लिंगायत माळी समाजाचा आहे,चौथा व पाचवा नंदिध्वज विश्व ब्राम्हण समाजाचा सहावा व सातवा मातंग समाजाचा अशाप्रकारे मानकरी असून सर्व समाजातील जाती धर्मातील भाविक सहभागी होतात.

प्रसारमाध्यमे[संपादन]

सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात लोकमत,सकाळ,दिव्य मराठी,संचार,तरुण भारत,पुढारी,जनमत,माणदेश नगरी,पुण्य नगरी अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांना हि पसंती आहे.

शिक्षण[संपादन]

आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे.सोलापूर विद्यापीठाची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गाविजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.

                           ===हिराचंद नेमचंद वाचनालय ===
        सोलापूर शहरात हिराचंद नेमचंद सार्वजनिक वाचनालय आहे.या वाचनालयाने सोलापूर शहराच्या वैभवात भर टाकली आहे. ]]या वाचनालयाचे सभासद असणे प्रतिष्ठेचे मानले जाते.सुरुवातीला ३० सभासद असलेल्या वाचनालयाचे जवळपास ३००० सभासद आहेत. येथील ग्रंथसंपदा १ लाख १२ हजारांवर गेली आहे.१९४८ पासून येथे बालविभाग सुरु करण्यात आला.वाचन संस्कृतीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका,सांस्कृतिक कार्यक्रमासाठी किर्लोस्कर सभागृह ,संगीत विभाग,वातानुकुलीत अम्फी थिएटर असा विकास झाला आहे.वाचनालयाच्या प्रगतीमध्ये प्रा.श्रीराम पुजारी यांचा मोलाचा वाटा आहे.

खेळ[संपादन]

दिवंगत क्रिकेटपटू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात.

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

 • डॉक्टर नसीमा पठाण [ साहित्य शैक्षणिक क्षेत्र ]
 • डॉ.द्वारकानाथ कोटणीस १९३८ मध्ये चीन ला पाठवलेल्या वैद्यांपैकी एक प्रसिद्ध वैद्य. (दुसरे सिनो - जपानी युद्ध)
 • त्र्यं.वि.सरदेशमुख –साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त लेखक (डांगोरा एका नगरीचा),
 • बी.एस.कुलकर्णी, निसर्ग तज्ञ , पक्षितज्ञ , १९७२ मध्ये माळढोक पक्ष्याचा शोध
 • सोलापूरच्या इतिहासात नाव मिळवलेले चार हुतात्मे ते खूप महत्वाचे मानले जाते
त्यांची नावे मलप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान 
हुसेन.
 • आनंद बनसोडे, गिर्यारोहक(एव्हरेस्ट वीर)
 • कवी कुंजविहारी
 • कृ.भि.आंत्रोळीकर
 • जब्बार पटेल
 • अतुल कुलकर्णी-सिनेअभिनेता
 • फैय्याज-नाट्य अभिनेत्री
 • बाबूराव जक्कल-पत्रकार
 • रंगाआण्णा वैद्य-पत्रकार
 • अच्युत गोडबोले
 • अरुण टिकेकर
 • य.दि.फडके
 • रा.ना.पवार-कवी
 • दत्ता हलसगीकर-कवी
 • राम जोशी-पेशवेकालीन कवी
 • यु.म.पठाण
 • माधव पवार-कवी
 • प्रभाकर महाराज
 • निर्मलकुमार फडकुुुले
 • शुभराय महाराज
 • प्रा.गजानन भिडेे-इतिहास तज्ज्ञ
 • लक्ष्मीनाराायण बोल्ली् -तेेेलुुुगु मराठी कवी
 • तुळशीदास जाधव-स्वातंत्र्य सैनिक
 • सुलभा पिशवीकर-शास्त्रीय संगीत गायीका
 • मारुती चित्तमपल्ल्ली्
 • यल्ला दासी-चित्रकार
 • डॉ. इरेश स्वामी - प्रथम कुलगुरू सोलापूर विद्यापीठ
 • प्रा.निशिकांत ठकार
 • आनंद कुंभार शिलालेख तज्ञ
 • वि. रा .पाटील
 • भगवान रामपुरे - शिल्पकार
 • पन्नालाल सुराणा
 • ग.सा.पवार
 • शशीकला- अभिनेत्री
 • सरला येवलेकर-अभिनेत्री

पर्यटन स्थळे[संपादन]

 • भुईकोट किल्ला,सोलापूर शहर
 • सिद्धेश्वर मंदिर,सोलापूर शहर
 • कंबर तलाव,सोलापूर शहर
 • प्रेरणा भुमी,सोलापूर शहर
 • संत दामाजी मंदिर,मंगळवेढा
 • हत्तरसंग कुडल ,ता.दक्षिण सोलापूर.
 • स्वामी समर्थ मंदिर,अक्कलकोट
 • श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,पंढरपूर
 • सयाजीराजे पार्क,शिवसृष्टी(अकलूज )

बाह्य दुवे[संपादन]

{www.dayanandsolapur.org/दयानद महाविद्यालयाचे सकेतस्थळ}

हेसुद्धा पहा[संपादन]

 • सोलापूूर मार्शल कायदा
 • सोलापूर जिल्हा
 • पंढरपूर– महाराष्ट्रातील आध्यात्मिक श्री विठ्ठल मदिंर येथे आहे. दरवर्षीआषढी आणि कार्तिकी एकादशीला येथे लाखोच्या संख्येने महाराष्ट्राशिवाय शेजारच्या राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात.
 • [{तुळजापूर }]- सोलापूर जिल्ह्यातून जाणारा उस्मानाबादला जाणाऱ्या रोडवर तुळजापूर हे गाव आहे. त्या गावात तूळजामातेचे मन्दिर आहे हे मन्दिर महाराष्ट्रातील लाखो लोकांचे आराध्य दैवत आहे. नवरात्रीच्या वेळेस येथे भक्तांची खूप गर्दी असते. येथे दर्शनासाठी महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातून भरपूर लोक येतात. हे एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते.


संदर्भ:साचा:Www.dayanandsolapur.org