वडोदरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वडोदरा
વડોદરા
भारतामधील शहर

Baroda Lvp.JPG
लक्ष्मीविलास पॅलेस
वडोदरा is located in गुजरात
वडोदरा
वडोदरा
वडोदराचे गुजरातमधील स्थान
वडोदरा is located in भारत
वडोदरा
वडोदरा
वडोदराचे भारतमधील स्थान

गुणक: 22°18′N 73°12′E / 22.3°N 73.2°E / 22.3; 73.2गुणक: 22°18′N 73°12′E / 22.3°N 73.2°E / 22.3; 73.2

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा वडोदरा जिल्हा
क्षेत्रफळ २३५ चौ. किमी (९१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४२३ फूट (१२९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २०,६५,७७१
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


बडोद्याचे महाराजा श्री सयाजीराव गायकवाड

वडोदरा (गुजराती: વડોદરા) हे भारताच्या गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर आहे. या शहराचे नाव बडोदे, बडौदा, Baroda असेही लिहितात. शहराला सयाजी नगरी ह्या नावानेसुद्धा ओळखले जाते. २०११ साली २०.६५ लाख लोकसंख्या असलेले वडोदरा गुजरातमधील अहमदाबादसुरतखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील २०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वडोदरा शहर विश्वामित्री नदीच्या काठावर राजधानी गांधीनगरच्या १२० किमी आग्नेयेस वसले आहे.

१६व्या व १७व्या शतकांमध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली मराठ्यांना येथून मुघलांना हुसकावून लावण्यात यश आले. १७२१ साली येथे गायकवाड घराण्याने बडोदा संस्थान स्थापन केले. ब्रिटीश राजवटीदरम्यान देखील बडोदा संस्थानाला स्वायत्त दर्जा प्राप्त होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४९ साली बडोदा संस्थानाला भारतामध्ये विलीन होणे भाग पडले.

सध्या वडोदरा गुजरातमधील उद्योगाचे मोठे केंद्र मानले जाते. खनिज तेल उद्योगामुळे वडोदऱ्याची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.

वाहतूक[संपादन]

वडोदरा विमानतळ शहराच्या ईशान्य भागात स्थित आहे व येथून दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे. भविष्यकाळामध्ये वडोदरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येईल असा अंदाज आहे. वडोदरा रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात. वडोदऱ्याहून मुंबईकडे जाण्यासाठी वडोदरा एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, गुजरात एक्सप्रेस, सौराष्ट्र मेल, पश्चिम एक्सप्रेस ,शताब्दी एक्सप्रेस इत्यादी दररोज सुमारे ५० गाड्या उपलब्ध आहेत.

मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ८ वडोदऱ्यामधून जातो. वडोदरा ते अहमदाबाद दरम्यानचा ९३ किमी लांबीचा राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ हा नियंत्रित-प्रवेश महामार्ग भारतामधील [राष्ट्रीय महामार्ग]] जाळ्यातील पहिलाच द्रुतगतीमार्ग आहे. ह्या मार्गामुळे वडोदरा व अहमदाबादेदरम्यान एका तासात प्रवास शक्य आहे.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]