Jump to content

महाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाड हे महाराष्ट्रात कोकण विभागातील एक शहर आहे. महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटर अंतरावर, तर पुणे शहरापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे चवदार तळे सत्याग्रह केला आणि हे ठिकाण इतिहासात अमर झाले. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे.

महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले शहर आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बऱ्यापैकी सुधारलेले शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा-वेगळा संगम आहे.

महाडचा इतिहास

[संपादन]

इतिहासात महाडचा सर्वात जुना संदर्भ ई.स.पु. २२५ मध्ये आढळतो.

ई.स. १३० मधे महाडवर बौद्ध धर्मिय कंभोजवंशीय राजा विष्णू पुलित यांचे राज्य होते. महाडची गांधारपाले बौद्ध लेणी त्याच्या राजवटीत निर्माण केली गेली, तसा शिलालेख आहे.

महाडवर मुख्यत: मौर्य सम्राट, कंभोज, सातवाहन, क्षात्रप, वाकाटक, शिलाहार, देवगिरीचे यादव, निजामशाह, आदिलशाह, शिवाजी महाराज, पोर्तुगिज, पेशवे, सिद्दि यांची राजवट झाली आहे. ई.स.१८१८मधे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाड जिंकले, १९४७ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाड ब्रिटिशांच्या अंमलाखाली होते.[]

ईसवी सनाच्या पहिल्या शतकापासुन महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर व व्यापारकेंद्र म्हणुन प्रसिद्ध होते.

  • त्यामुळेच महाड हे नाव पाली भाषेतील शब्द महाहट् वरून पडले.
    • महा-मोठि व हट्-बाजारपेठ म्हणजेच मोठी बाजारपेठ.

देवगिरीच्या यादव राजवटीत महाराष्ट्राची सर्वात जास्त व्यापारी उन्नती झाली. तेव्हा एक व्यापारकेंद्र व बंदर असलेल्या महाडची जास्त भरभराट झाली.

"महाडचा कोट" हा छोटेखानी किल्ला आदिलशाही काळात बांधला गेला. १७७४ मध्ये नाना फडणवीसांनी कोटाची दुरुस्ती करून तोफा तैैैनात केल्या होत्या.

  • १८८१ च्या खानेसुमारी प्रमाणे महाडची लोकसंख्या ६८०४ होती.

इंग्रजांनी १८६६ मधे महाड नगरपालिका स्थापन केली.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

नागरी सुविधा

[संपादन]

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

महाडमधील व महाडच्या आसपास असलेली काही प्रेक्षणीय स्थळे:

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
  • चवदार तळे
  • रायगड किल्ला
  • श्री वीरेश्वर महाराज मंदिर (शिवकालीन मंदिर)
  • सव येथील गरम पाण्याचे झरे
  • गांधारपाले बुद्धकालीन लेण्या
  • शिवथरघळ (संत रामदास यांनी दासबोध या गुंफेत लिहिला).
  • रम्य धबधबा व नैसर्गिक हिरवळ
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कार्यभूमी.
  • नदीवरचे जुने बंदर. या बंदरातून छोटे व्यापारी किंवा प्रवासी अरबी समुद्रात जात असत.
  • वरदायनी माता मंदिर (गाव वाळणकोंडी)
  • केंबुर्ली येथील मनोरम धबधबा.
  • कोतुर्डे येथील धरण
  • दापोली येथील धबधबे (वाळण दापोली )
  • किल्ले लिंगाणा (दापोली... किल्ले रायगड पासून ९ किलोमीटर अंतरावर)

हे सुद्धा पहा

[संपादन]

पुस्तके

[संपादन]
  • ऐतिहासिक महाड (अशोक बेंडखळे)

बाह्य दुवे

[संपादन]
  1. Mahārāshṭra Rājya gêjheṭiara. Darśanikā Vibhāga, Mahārāshṭra Śāsana. 1900.
  2. /https://www.bankofindia.co.in/